Sachin Dev, Arya Rajendran
Sachin Dev, Arya RajendranSarkarnama

देशातील सर्वात तरूण महिला महापौरांचे आमदाराशी जुळले सूर

आर्या या देशातील सर्वात कमी वयाच्या महापौर आहेत. तर सचिन देव हेही केरळमधील सर्वात तरूण आमदार आहेत.

तिरूवनंतपुरम : राजकारणामुळे अनेक घरांमध्ये जशी फाटाफूट होते, तशीच अनेक मनं जुळल्याचीही उदाहरणं आहेत. केरळची राजधानी तिरूवनंतपुरमच्या महापौर आर्या राजेंद्रन (Arya Rajendran) आणि बलुसेरीचे आमदार सचिन देव (Sachin Dev) यांचीही अशीच कहाणी आहे. दोघे विवाह करणार असून रविवारी बड्या नेत्यांच्या उपस्थित दोघांचा साखरपुडा पार पडला. आर्या या देशातील सर्वात कमी वयाच्या महापौर (Mayor) आहेत. तर सचिन देव हेही केरळमधील (Kerala) सर्वात तरूण आमदार आहेत.

मागील महिन्यातच या जोडीने विवाहाची घोषणा केली होती. दोघेही कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) सदस्य नेते आहेत. पक्षाच्या बालासंगम या विद्यार्थी विभागापासून ते एकमेकांना ओळख होते. संघटनेत काम करत असतानाच त्यांची ओळख वाढत गेली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. आर्य़ा या केवळ 21 वर्षांच्या असताना महापौर बनल्याने देशभर त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यांना 100 पैकी 54 मतं मिळाली होती.

Sachin Dev, Arya Rajendran
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारच भाव खाऊन गेले!

आर्या यांनी गणित विषयात पदवी मिळवली आहे. तर त्यांचे वडील इलेक्ट्रीशियन आहेत. आई जीवन विमा निगमच्या सेवेत आहेत. सचिन देव हे कोझीकोडमधील नेल्लीकोडचे राहणारे आहते. त्यांनी कोझीकोडच्या सरकारी महाविद्यालयातून इंग्रजी साहित्याची पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी एलएलबीचीही पदवी मिळवली आहे. ते 28 वर्षांचे असून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. सध्या ते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे (SFI) सहसचिव आहेत.

Sachin Dev, Arya Rajendran
भाजप खासदाराच्या मुलाचा पक्षाला रामराम अन् घराणेशाहीवरून थेट केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा

या विवाहाविषयी आर्या यांनी सांगितले की, 'आम्ही लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर कुटुंबाला याबाबत सांगितले. एकच विचारधारा असलेल्या व्यक्तीशी विवाह करणे माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.' आर्या या सध्या बालासंगमच्या राज्य अध्यक्ष असून एसएफआयच्या राज्य समिती सदस्यही आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com