भारतीय महिला पर्यटकाचा मृत्यू; आरोग्यमंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा

Indian woman dies in Portugal : पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांचा राजीना
Marta Temido, Indian woman dies in Portugal
Marta Temido, Indian woman dies in Portugalsarkarnama

नवी दिल्ली : पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे भारतीय (India) वंशाच्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्ता टेमिडो यांनी राजीनामा दिला आहे. या महिलेला मॅटर्निटी वॉर्डमध्ये दाखल करण्यात येणार होते. मात्र, तिला पोर्तुगालच्या सर्वात मोठ्या रूग्णालयात जागा मिळाली नाही. दरम्यान, दुसऱ्या एका रूग्णालयात घेऊन जाण्याआधीच या महिलेचा मृत्यू झाला. (Indian woman dies in Portugal)

भारतीय पर्यटक महिलेला रूग्णालयातल्या वॉर्डमध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे तिला दुसऱ्या रूग्णालयात घेऊन जाताना महिलेचा मृत्यू झाला. याच प्रकरणावरुन आरोग्यमंत्री डॉ. मार्ता टेमिडो यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पोर्तुगालमध्ये काही दिवसात अशा घटना घडल्या आहेत. आरोग्य व्यवस्थेतल्या दोषांमुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे.

मंगळवारी पोर्तुगाल सरकारने निवेदन प्रसिद्ध केले. त्यामध्ये म्हटले आहे की, डॉ. मार्ता यांना हे समजून चुकले होते की आपण आता पदावर राहण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला. पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी म्हटले की 'गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे मार्ता यांनी राजीनामा दिला. आत्तापर्यंत आरोग्य व्यवस्थेतल्या ढिसाळपणा समोर आले आहे. भारतीय पर्यटक महिलेचा मृत्यू होणे ही यातली शेवटची घटना होती, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.

Marta Temido, Indian woman dies in Portugal
मोठी बातमी : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक

डॉ. मार्ता या २०१८ पासून आरोग्यमंत्री होत्या. डॉ. मार्ता यांनी कोरोना काळात चांगले काम केले होते. कोरोना काळातील त्यांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती त्यामुळे त्यांचे कौतुक झाले होते. मात्र, भारतीय महिला पर्यटकाच्या मृत्यूनंतर सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मॅटर्निटी वॉर्डवर, स्टाफवर आणि ते देत असलेल्या कारणांचाही लोकांनी मोठ्या प्रमाणावर निषेध केला होता. गर्भवती महिलेला वाचवण्यात यश आले नाही. मात्र, बाळाला वाचवण्यात यश आले आहे. सध्या या महिलेचे बाळ सुरक्षित आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळाला ठेवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in