तिकीट बुक केलं अन् विमानतळच बंद झालं! गुरू नाईकांची भारतात परतण्यासाठी धडपड

ते मागील सहा वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम करत आहेत. सध्या ते काबूलमध्ये एका हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत.
Indian citizen Guru Naik is stuck in a hotel in Kabul
Indian citizen Guru Naik is stuck in a hotel in Kabul

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देशाबाहेर जाण्यासाठी अनेकांनी काबूल विमानतळाकडं कूच केली. विमानतळावरील झुंबड आवाक्याबाहेर केल्यानं अमेरिकन सैन्याला हवेत गोळीबार करावा लागला. परिस्थिती अधिकच बिकट होत गेल्यानं विमानतळ बंद करावं लागलं. त्यामुळं भारतासह अनेक विदेशी नागरिक काबूलमध्येच अडकून पडले आहेत. गुरू नाईक हे त्यापैकीच एक असून काबूलमध्ये एका हॉटेलमध्ये लपले आहेत. त्यांनी एका व्हिडिओद्वारे मायदेशी परत नेण्याची विनवणी मोदी सरकारला केली आहे. (Indian citizen Guru Naik is stuck in a hotel in Kabul)

गुरू नाईक यांनी सोमवारी हा व्हिडिओ केला आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिलं आहे. नाईक यांनी या व्हिडिओमध्ये आपबीती सांगितली आहे. ते मागील सहा वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम करत आहेत. सध्या ते काबूलमध्ये एका हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्यासोबत भारतासह इतर देशांचे नागरिकही आहेत. विमानतळ बंद असल्यानं त्यांना तिथून बाहेर पडता येत नाही. 

नाईक म्हणतात, आम्ही सर्वजण भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत. इथली स्थिती इतक्या लवकर बदलेल, असं वाटलं नव्हतो. दूतावासानं दिलेल्या इशाऱ्यानंतर १६ ऑगस्टसाठी ‘काम एअर’ आणि ‘एअर इंडिया’ या दोन कंपन्यांचे तिकीट बुक केलं होत. पण विमानतळंच बंद करण्यात आलं. दोन्ही विमानं रद्द झाली. विमानांचं उड्डाण होत नसल्यानं माझ्यासह अनेकांची स्थिती वाईट आहे. आम्हाला मायदेशी कधी परतायला मिळेल, हे कळत नाही. 

सोमवारी कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून मी रविवारी (ता. 15) रात्रीच काबूलमधील हॉटेलमध्ये आलो. आता इथे खूप वाईट परिस्थिती आहे. इतर देशांतील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे देश प्रयत्न करत आहेत. काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांनाही लवकर मायदेशी न्या, अशी विनवणी नाईक यांनी केली आहे. 

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांना भारतात आणण्‍याचे प्रयत्नही सुरू असून भारत सरकारने आपत्कालीन मदतीसाठी दूरध्वनी क्रमांकही दिले आहेत. देशात परत येण्याची इच्छा असलेल्या नागरिकांच्या संपर्कात असल्याचेही बागची यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com