2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल : पंतप्रधानांची मोठी घोषणा

PM Nanrendra Modi| आज भारतातील प्रत्येक क्षेत्र युवाशक्तीच्या जोरावर पुढे जात आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

PM Narendra Modi | बंगळूर : ''भारत 25 वर्षांत म्हणजे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची भूमिका बजावेल,' असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात गुंतवणूक करणे म्हणजे समावेशकतेमध्ये गुंतवणूक करणे, लोकशाहीमध्ये गुंतवणूक करणे, जगासाठी आणि चांगल्या, स्वच्छ आणि सुरक्षित ग्रहासाठी गुंतवणूक करणे. या गुंतवणुकीवर आणि मानवी भांडवलावर लक्ष केंद्रित करूनच विकासाची उच्च उद्दिष्टे साध्य करता येतील.

स्टार्ट-अप इकोसिस्टमचे कौतुक

भारताच्या स्टार्ट-अप इकोसिस्टमला गती देण्यासाठी कर्नाटक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतातील 100 युनिकॉर्नपैकी 40 फक्त कर्नाटकातून येतात. म्हणजेच त्यांचे मुख्यालय कर्नाटकात आहे. कर्नाटकच्या स्टार्ट-अप इकोसिस्टममध्ये दुहेरी इंजिनची ताकद आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आणि चीननंतर भारताची स्टार्ट-अप इकोसिस्टम ही जगातील तिसरी मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम आहे.

औद्योगिक क्रांतीमध्ये भारतीयांची भूमिका

'मला जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष विशेषत: पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनकडे वेधायचे आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीचा मार्ग बदलला आहे. आज जेव्हा जग इंडस्ट्री 4.O कडे वाटचाल करत आहे, तेव्हा या औद्योगिक क्रांतीमध्ये भारतीय तरुणांची भूमिका आणि प्रतिभा थक्क करण्याजोगी आहे.

8 वर्षात 80 हजार स्टार्टअप्स

भारतात 8 वर्षांत 80 हजारांहून अधिक स्टार्टअप्स तयार झाले आहेत. आज भारतातील प्रत्येक क्षेत्र युवाशक्तीच्या जोरावर पुढे जात आहे. गेल्या वर्षी भारताने विक्रमी निर्यात केली. कोविड नंतरच्या परिस्थितीत ही कामगिरी खूप महत्त्वाची ठरते. भारतातील तरुणांच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आम्ही भारतीय शिक्षण व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल केले आहेत. भारतातील विद्यापीठे, तंत्रज्ञान विद्यापीठे आणि व्यवस्थापन विद्यापीठांची संख्या गेल्या काही वर्षांत 50 टक्क्यांनी वाढली आहे.

भारताला पुढे जावेच लागेल

इतकेच नव्हे तर, भारत आज 21व्या शतकात ज्या उंचीवर आहे तिथून सतत पुढे जावे लागेल. गेल्या वर्षी भारताने सुमारे $84 अब्ज डॉलरची विक्रमी थेट विदेशी गुंतवणूक केली होती. भारतातही युद्ध आणि महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विपरीत परिणाम झाला असतानाही आज संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com