धोका वाढतोय...देशात म्युकरमायकोसिसचे 8 हजार 848 रुग्ण; सर्वाधिक रुग्ण गुजरातमध्ये

काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे.
india repcords 8 thousand 848 mucermycosis cases till 21 may
india repcords 8 thousand 848 mucermycosis cases till 21 may

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराचे रुग्ण देशभरात वेगाने वाढू लागले असून, अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे. देशात आजच्या घडीला या आजाराचे 8 हजार 848 रुग्ण असून, सर्वाधिक रुग्ण गुजरात राज्यात आहेत. 

केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 21 मेपर्यंत म्युकरमायोसिसचे 8 हजार 848 रुग्ण आढळले आहेत. यात गुजरातमध्ये सर्वाधिक 2 हजार 281 रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2 हजार रुग्ण सापडले आहे. आंध्र प्रदेशात 910 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी 58.66 रुग्ण या तीन राज्यांत आहेत. 

म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सरकारने आढावा घेतला आहे. हा आढावा घेतल्यानंतर राज्ये आणि केंद्रशासित अॅम्फोटेरीसिन-बीच्या 23 हजार 680 व्हाईल्स देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेच व्हाईल्सचा पुरवठा करण्यात आला आहे, असे गौडा यांनी सांगितले. 

म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण काही दिवसांत दगावतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे 'सीडीसी'चे म्हणणे आहे. भारतात या आजाराचे दरवर्षी सुमारे डझनभर रुग्ण सापडतात. सर्वसाधारणपणे शरीर अशा प्रकारच्या बुरशीला प्रतिकार करते. परंतु, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले याची शिकार होतात. अवयव प्रत्यारोपण करणारे आणि कर्करुग्णांमध्ये हा आजार आधी प्रामुख्याने आढळून येत होता. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत या आजारामुळे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

स्टेरॉईड्सचा अतिवापर म्युकरमायकोसिसला कारणीभूत 
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) एम्सचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी यासाठी स्टेरॉईड्सचा अतिवापरास जबाबदार धरले होते. ते म्हणाले होते की, म्युकरमायकोसिस होण्यामागील प्रमुख कारण हे स्टेरॉईड्सचा गैरवापर हे आहे. कोरोनाबाधित, मधुमेह आणि इतर रुग्ण स्टेरॉईड्स घेत आहेत. यामुळे त्यांना बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे. हे रोखण्यासाठी आपल्याला तातडीने स्टेरॉईड्सचा गैरवापर थांबवायला हवा. हा आजार तोंड, नाक, डोळ्याची बुबुळे आणि मेंदूवर परिणाम करु शकतो. यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि तो फुफ्फुसातही पसरू शकतो.  

कोरोनाच्या या लाटेत उपचारासाठी स्टेरॉईड्सचा वापर वाढला आहे. सौम्य लक्षणे असताना अथवा आजाराच्या सुरवातीला टप्प्यात स्टेरॉईड्सचे मोठे डोस दिले जात आहेत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असून, म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता आणखी बळावत आहे. गरज नसताना अथवा सौम्य लक्षणे किंवा आजाराच्या सुरवातीच्या टप्प्यात स्टेरॉईड्स दिल्याने हा संसर्ग होत आहे. हा आजार रोखण्यासाठी प्रथम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवायला हवे. स्टेरॉईड्सवर असणाऱ्या व्यक्तींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. याचबरोबर त्यांना स्टेरॉईड देताना काळजी घ्यावी, असा सल्ला गुलेरिया यांनी दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com