कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं! 24 तासांत तब्बल 90 टक्के रुग्ण वाढले

देशात कोरोनाने (Covid-19) पुन्हा एकदा डोके वर काढले असून, आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत.
Covid Testing, Covid-19 News Updates, Covid-19 cases Today
Covid Testing, Covid-19 News Updates, Covid-19 cases TodaySarkarnama

नवी दिल्ली : देशात कोरोनाने (Covid-19) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट सुरू होती. आता अचाकन रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. मागील 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांत तब्बल 89.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. पुन्हा एकदा जगावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले असून, ही कोरोनाची चौथी लाट (Fourth Wave) असल्याचा धोका व्यक्त होत आहे. (Covid-19 News Updates)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत कोरोना रुग्णसंख्या 2 हजार 183 वर पोचली आहे. त्याआधीच्या 24 तासांत ती 1 हजार 150 होती. याचबरोबर पॉझिटिव्हीटी दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तो 24 तासांत 0.31 टक्क्यावरुन 0.83 टक्क्यावर पोचला आहे. मागील 24 तासांत 1 हजार 985 कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत. याचवेळी सक्रिय रुग्णांच्या संख्येत किरकोळ घट होऊन ती 11 हजार 542 वर आली आहे.

Covid Testing, Covid-19 News Updates, Covid-19 cases Today
भाजपचा बडा नेता नाराज! पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीलाच दांडी

चीनमध्ये कडक लॉकडाऊन

चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागल्याने चीनमधील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. चीनमधील शेझेंन आणि शांघाय या मोठ्या शहरात कोरोनाविषयक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाचे प्रमाण मागील दोन वर्षातील अधिक तीव्र आहे. यामुळे प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांनी घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. सर्व प्रौढांना तीन पीसीआर चाचण्या करण्यास सांगितले आहे. शांघायमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला असून, शहरातील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Covid Testing, Covid-19 News Updates, Covid-19 cases Today
मी पुन्हा येईन! राजीनामा देताच भाजपच्या बड्या नेत्याची घोषणा

रॅपिड अँटिजेन चाचणीचे किट सार्वजनिकरीत्या वापरासाठी उपलब्ध करून देणे आणि आरोग्य यंत्रणांचे सुस्तावलेले वरिष्ठ अधिकारी यामुळे चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा करणयात आला आहे. संपूर्ण लॉकडाऊन टाळावे, अशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येत आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला धोका बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी निर्बंध लादणाऱ्या शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com