गुड न्यूज : देशाला मिळणार आणखी एक 'मेड इन इंडिया' कोरोना लस

देशात सध्या कोरोनाच्या दोन लशी वापरात असून, लवकरच तिसरी लसही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
India may approve covid vaccine sputnik v for emergency use
India may approve covid vaccine sputnik v for emergency use

मुंबई : देशात 1 एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून, यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरवात होत आहे. देशात सध्या कोरोनाच्या दोन लशी वापरात असून, लवकरच तिसरी लसही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रशियाची स्पुटनिक व्ही लशीला देशात वापराची परवानगी देण्यावर सरकार विचार करीत आहे. यावर आजच निर्णय होणार आहे. 

स्पुटनिकचे उत्पादन डॉ. रेड्डीज ही भारतीय कंपनी करीत आहे. या कंपनीने लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा अहवाल सरकारकडे सादर केला आहे. यावर केंद्रीय औषध नियामक संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत आजच या लशीच्या वापराबाबत निर्णय होणार आहे. या लशीला आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्याची परवानगी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

डॉ.रेड्डीजने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडशी भागीदारी केली. यातून स्पुटनिक व्ही या लशीच्या भारतात चाचण्या आणि वितरण याचे अधिकार डॉ.रेड्डीज कंपनीला मिळाले आहेत. ही लस रशियाचे आरोग्य मंत्रालयाने विकसित केली असून, तिचे भारतात उत्पादन डॉ. रेड्डीज कंपनी करीत आहेत.  

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. त्यामुळे आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नोंदणी आपोआप होत होती. आता दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे असल्याने आपोआप नोंदणी बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागेल. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com