India Covid 19 news : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक: भारतात लागणार निर्बंध?

संपूर्ण जगाला चार भिंतीत कोंडून ठेवणाऱ्या कोरोना व्हायरसने (Covid 19 ) चीनमध्ये पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आहे.
Covid 19| Delhi |Covid 19 news updates, Coronavirus News Updates
Covid 19| Delhi |Covid 19 news updates, Coronavirus News Updates

India Covid 19 news : संपूर्ण जगाला चार भिंतीत कोंडून ठेवणाऱ्या कोरोना व्हायरसने (Covid 19 ) चीनमध्ये पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आहे. गेल्या महिनाभरात चीनमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता भारतातही पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चीनमधील कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता केंद्र सरकारने मंगळवारी (२० डिसेंबर) सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारांना पत्र पाठवत बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेनसिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री डॉ, भारती पवार यांनीदेखील देशातील मास्क सक्तीबाबत सूचक विधान केले आहे. पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यासह देशात पुन्हा मास्क सक्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.

Ahmednagar News : स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाटेतच अडवलं...

चीनमध्ये कोरोनाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. त्यामुळे देशातील निर्बंधाबाबत आज होणाऱ्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. तसेच काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आबहेत. याशिवाय भारती पवार यांनी नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सुचना केल्या आहेत.

चीनमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि तेथील परिस्थिती पाहता, भारतातही पुन्हा एकादा मास्क सक्तीची गरज निर्माण झाली आहे. आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांना येत्या काही दिवसात पुन्हा एकदा मास्क परिधान करावा लागू शकतो का? याबाबत आजच्या बैठकीत काय निर्णय होणार आहे. याशिवाय चीनमधून भारतात येणारे प्रवासी, पर्यटकांच्याबाबतही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. असंही भारती पवार यांनी म्हटलं आहे.

जगभरातून पुन्हा एकदा आठवडाभरातच ३६ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने भारतातही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण झाले आहे. आतापर्यंत भारताने 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. त्यामुळे भारतात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये, याकरिता केंद्रीय पातळीवर महत्वाची बैठक होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com