दे धक्का! येडियुरप्पांच्या निकटवर्तीयावरच 'इनकम टॅक्स'चे छापे

प्राप्तिकर विभागाने बंगळूरसह 50 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. यात येडियुरप्पांच्या निकटवर्तीयाचाही समावेश आहे.
दे धक्का! येडियुरप्पांच्या निकटवर्तीयावरच 'इनकम टॅक्स'चे छापे
B.S.Yediyurappa File Photo

बंगळूर : प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax) कर्नाटक (Karnatka) व गोवा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आज पहाटे बंगळूरसह इतर ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. यात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचे (B.S.Yediyurappa) स्वीय साहाय्यक उमेश (Umesh) यांच्या घर व कार्यालयावरही छापा घालण्यात आला आहे. जलसंपदा विभागातील (Irrigation Department) भ्रष्टाचार प्रकरणी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी मध्यस्थ, कंत्राटदार आणि कंपन्यांवर छापे टाकले.

प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर आणि गोवा कार्यालयातील तीनशेहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे छापे घातले. जलसंपदा विभागातील सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल छापे घालण्यात आले. जलसंपदा विभागाची कंत्राटे देताना मोठा भ्रष्टाचार होत आहे. यात येडियुरप्पांची पीए उमेश हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. उमेश यांनी या माध्यमातून अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचे कमिशन गोळा केल्याचाही संशय आहे.

उमेश यांच्यावरील छाप्याने येडियुरप्पा हे नाराज झाले आहेत. उमेश यांच्यासह काही कंत्राटदार, चार्टर्ड अकाउंटंट, बांधकाम साहित्याचे व्यापारी आणि येडियुरप्पांचे पुत्र बी.विजयेंद्र यांच्या जवळच्या काही व्यक्तींवर छापे घालण्यात आले. बंगळूरसह, बागलकोट, तुमकूर येथे छापे घालण्यात आले. यात कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत.

B.S.Yediyurappa
काँग्रेसवर निशाणा अन् प्रशांत किशोर यांचा गांधी परिवारापासून दुरावल्याचा संदेश

बस कंडक्टर ते मुख्यमंत्र्यांचा पीए

येडियुरप्पांचे पीए उमेश हे शिमोगा जिल्ह्यातील आयनूरचा रहिवासी आहेत. ते सुरवातीला बीएमटीसीमध्ये कंडक्टर म्हणून काम करीत होते. यलहंका येथील पुट्टेनहळ्ळी बीएमटीसी डेपोत ते काम करीत होते. नंतर त्यांनी आमदार अय्यनूर मंजुनाथ यांचे स्वीय सहायक म्हणून काही काळ काम करीत होते. येडियुरप्पांचे स्वीय सहायक म्हणून ते 2012 पासून काम करीत होते. विजयेंद्र यांचेही ते निकटवर्ती होते. उमेश यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

B.S.Yediyurappa
मुलगा नेपाळमध्ये पळाला? अखेर केंद्रीय मंत्र्यांनीच केला खुलासा

राज्यात प्राप्तिकर विभागाने घातलेल्या छाप्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, राज्यभरात प्राप्तिकर विभागाचे छापे पडल्याची माहिती मिळाली आहे. या छाप्याशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. अधिक माहिती हाती आल्याशिवाय मी यावर अधिक बोलू शकत नाही.

Related Stories

No stories found.