भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर छापे अन् 750 कोटींची मालमत्ता उघड
BJPsarkarnama

भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर छापे अन् 750 कोटींची मालमत्ता उघड

प्राप्तिकर विभागाने कर्नाटकसह तीन इतर राज्यांत टाकलेल्या या छाप्यांत तब्बल 750 कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

बंगळूर : प्राप्तिकर विभागाने (Income Tax) माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचे (B.S.Yediyurappa) स्वीय साहाय्यक एम.आर. उमेश (M.R.Umesh) यांच्या घर व कार्यालयावरही छापा घालण्यात आला होता. त्यावेळी प्राप्तिकर विभागाने कर्नाटकसह तीन इतर राज्यांत टाकलेल्या या छाप्यांत तब्बल 750 कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पांचे निकटवर्तीय एम.आर.उमेश यांच्यासह 47 ठिकाणी एकाच वेळी छापे मारण्यात आले होते. सिंचन आणि महामार्ग प्रकल्पांची कंत्राटे घेणाऱ्या बंगळूरस्थित तीन मोठ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागाने 300 कर्मचाऱ्यांसह 7 ऑक्टोबरला ही कारवाई केली होती. बंगळूरस्थित तीन कंपन्यांनी बोगस खरेदी, कामगार खर्च आणि बनावट उपकंत्राटे यांचा खर्च दाखवून उत्पन्न कमी दाखवले होते. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत 750 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. दरम्यान, येडियुरप्पांचे पीए उमेश यांच्यावरील छाप्यात नेमके काय सापडले याचा खुलासा प्राप्तिकर विभागाने केलेला नाही.

येडियुरप्पांचे पीए उमेश हे शिमोगा जिल्ह्यातील आयनूरचा रहिवासी आहेत. ते सुरवातीला बीएमटीसीमध्ये वाहक कम चालक म्हणून काम करीत होते. यलहंका येथील पुट्टेनहळ्ळी बीएमटीसी डेपोत ते काम करीत होते. नंतर त्यांनी आमदार अय्यनूर मंजुनाथ यांचे स्वीय सहायक म्हणून काही काळ काम करीत होते. येडियुरप्पांचे स्वीय सहायक म्हणून ते 2012 पासून काम करीत होते. विजयेंद्र यांचेही ते निकटवर्ती होते. उमेश यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

BJP
न्यायालयाचा दणका! शिक्षणमंत्र्यांसह सहा नेत्यांना हजर राहण्याची तंबी

आता उमेश यांना बंगळूर महानगर परिवहन महामंडळाच्या (BMTC) सेवेत पुन्हा वाहक कम चालक म्हणून पाठवण्यात आले आहे. बीएमटीसीने मुख्यमंत्री कार्यालयातील उमेश यांची प्रतिनियुक्ती रद्द केली. कारण उमेश हे केवळ येडियुरप्पांनी सांगितले होते की उमेश हे केवळ आपल्यासाठीच नव्हे तर विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासाठीही काम करीत आहेत. अखेर उमेश यांनी पुन्हा बीएमटीसीच्या सेवेत बोलावून घेत आहेत. नियमानुसार प्रतिनियुक्तीवर केवळ 2 ते 5 वर्षे राहू शकता येते परंतु, उमेश हे दशकभराहून अधिक काळ मुख्यमंत्री कार्यालयात होते.

BJP
लखीमपूर खीरीतील कार्यकर्त्याची 10 दिवसांनी भाजपला झाली आठवण

जलसंपदा विभागातील निविदा वाटपात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी मध्यस्थ, कंत्राटदार आणि कंपन्यांवर छापे टाकले. प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर आणि गोवा कार्यालयातील तीनशेहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे छापे घातले. जलसंपदा विभागातील सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल छापे घालण्यात आले. जलसंपदा विभागाची कंत्राटे देताना मोठा भ्रष्टाचार होत आहे. यात येडियुरप्पांची पीए उमेश हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. उमेश यांनी या माध्यमातून अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचे कमिशन गोळा केल्याचाही संशय आहे.

Related Stories

No stories found.