हिरानंदानी ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर; 3 शहरात कारवाई

Hiranandani Group | राज्यातील महाविकास आघाडीतील (mahavikas Aghadi) नेतेमंडळीवर सध्या धाडी पडत आहेत.
Hiranandani Group News| Hiranandani Group IT Raid News, IT Raid on Hiranandani Group News
Hiranandani Group News| Hiranandani Group IT Raid News, IT Raid on Hiranandani Group News

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीतील (mahavikas Aghadi) नेतेमंडळीवर सध्या धाडी पडत आहेत. हे प्रकरण सुरु असतानाच आता आयकर विभागाने (Income tax department) आता राज्यातील बड्या रिअल इस्टेट कंपनीवर छापेमारी करत कारवाई सुरु केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह आता उद्योग क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने हिरानंदानी ग्रुपच्या (Hiranandani Group) विविध कार्यालयांवर आज (२२ मार्च) छापेमारी केली आहे. (IT Raid on Hiranandani Group News)

करचोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आयकर विभागाच्या वतीने मुंबई, चेन्नई, बंगळुरूसह 24 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या घरावरही छापे टाकण्यात येत आहे. हिरानंदानी समूहाचा पवई, मुंबई येथे प्रमुख प्रकल्प आहे.

Hiranandani Group News| Hiranandani Group IT Raid News, IT Raid on Hiranandani Group News
कोल्हापुरात पोटनिवडणूक लागली अन् चंद्रकांतदादांचं ‘ते’ चॅलेंज आठवलं…

1978 मध्ये दोन भावांनी - निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी यांनी हिरानंदानी डेव्हलपर्सची स्थापना केली. गेल्या चाळीस वर्षांपासून या ग्रुपने प्रामुख्याने महाराष्ट्रात अनेक प्रकल्प उभारले. आता निरंजन हे हिरानंदानी कम्युनिटीजचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, सुरेंद्र हिरानंदानी हे हाऊस ऑफ हिरानंदानीचे अध्यक्ष आणि संचालक आहेत.

दरम्यान आज (22 मार्च) सकाळपासून देशभरातील हिरानंदानी ग्रुपच्या विविध मालमांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात येत आहेत. मुंबई, ठाण्यासह देशाच्या अनेक भागात सकाळपासून छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बडे बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर असल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मुंबईतील कुर्ल्यातील घरावर छापे टाकले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक सध्या 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. तो मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. दाऊद इब्राहिम आणि मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com