गळती लागताच योगींची शहांकडे धाव...कोरोनाग्रस्त नड्डा, राजनाथसिंहांना व्हर्च्युअली बोलावलं

स्वामीप्रसाद भाजपला धक्का देत अखिलेश यादव यांच्या सायकलवर स्वार झाले.
Amit Shah, Yogi Adityanath
Amit Shah, Yogi Adityanathsarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची लखनौतून पाठ फिरताच यूपीतील दिग्गज नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी स्वतःची खासदार कन्या संघमित्रा मौर्य व ३ आमदारंसह भाजपला (BJP) रमराम करत जोरदार झटका दिला. आणखीही काही आमदार भाजप सोडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर दिल्लीतील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी 'डॅमेज कंट्रोल'ची सारी सूत्रे स्वतःकडे घेतली. मौर्य यांनी भाजप सोडल्याने पक्षावर फारसा परिणाम होणार नाही व आगामी निवडणुकीत स्पष्ट बहुमतासह भाजपच पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास नेते बोलून दाखवत आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री, बन्सल, उर्जामंत्री श्रीकांत शर्मा आदींशी चर्चा करून पहिली उमेदवारी यादी तयार केली. ती घेऊन बन्सल दिल्लीत आले आहेत. मात्र, योगींची लखनौतून पाठ पिरताच स्वामीप्रसाद भाजपला धक्का देत अखिलेश यादव यांच्या सायकलवर स्वार झाले. ही बातमी येताच योगी आदित्यनाथ यांच्या दिल्ली दौऱ्याच्या अजेंड्यातच मोठा बदल झाला. अमित शहा व अन्य नेत्यांबरोबरच्या बैठकीत योगी व बन्सल सहभागी झाले होते. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व संरक्षणमंत्री राजनाथसिंह कालच कोरोनाग्रस्त झाल्याने ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. स्वामीप्रसाद यांनी आपल्या काही समर्थकांना निवडणुकीत तिकीट देण्याचा दबाव आणला होता. तो योगींनी जुमानला नाही व आपली यादी अंतिम केली.

Amit Shah, Yogi Adityanath
विरोधी पक्षाच्या नेत्यानं थेट भाजप मुख्यालयासाठी पाठवलं कुलूप!

त्यामुळे चिडून मौर्य यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली, असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे तीन तास चाललेल्या या मंथनात उमेदवारांची यादी ठरविणे हा आधी प्राधान्यक्रमावरील विषय होता. मात्र, बैठक सुरू होता होता पक्षत्याग करून जाऊ शकतील असे कोण कोण आमदार आहेत याबाबतची चाचपणी करण्यात आली. नंतर संबंधितांशी दिल्ली व लखनौतून संपर्कही साधण्यात आल्याचे समजते. स्वामीप्रसाद यांच्यासारखा उपद्रवमूल्य असलेला नेता काही आमदार घेऊन सरळ यादव यांना जाऊन मिळतो. त्याची कुणकूण पुन्हा सत्तेकडे झेपावणाऱ्या भाजपच्या राज्य नेतृत्वाला लागली नव्हती का, असा सवाल यातून उपस्थित झाला. आगामी ३ दिवस योगी दिल्लीत आहेत व या काळात पंतप्रधानांसह अन्य नेत्यांनाही ते भेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मौर्य यांची समजूत काढण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यावर दिली होती. मात्र, स्वामीप्रसाद यांचे मन वळविण्यात त्यांनाही यश आले नाही. त्यावर, त्यांना समजावण्याचे प्रयत्न सोडा, असा संदेश के. पी. मौर्य यांना दिल्लीतून पाठविण्यात आला. स्वामीप्रसाद व तीन आमदार भाजपमधून गेले तरी पक्षाला काही फरक पडणार नाही असा विश्वास भाजप नेते व्यक्त करतात. यापुढे कोणताही भाजप आमदार इकडे तिकडे जाणार नाही, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

Amit Shah, Yogi Adityanath
भाजपला खिंडार! चार तासांतच मंत्र्यासह पाच आमदारांची 'एक्झिट'

संक्रांतीनंतर पहिली यादी?

योगी आदित्यनाथ व संघटनमंत्री सुनील बन्सल दिल्लीत दाखल झाले. येत्या १३ जानेवारीला (गुरूवारी) होणाऱ्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत योगी व अन्य नेते सहभागी होते. या बैठकीत पहिल्या व शक्यतो दुसऱ्या फेरीतील निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब मिळवावे असा योगी यांचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील भाजप उमेदवारांची नावे निश्चित होतील. मात्र यादीची घोषणा संक्रांतीनंतर म्हणजे १५ किंवा १६ तारखेला होईल, अशी शक्यता भाजप सूत्रांनी वर्तविली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in