Tripura Election News : त्रिपुरातही भाजपचे टेन्शन वाढले; सीपीआय अन् काँग्रेस साथ-साथ

Tripura Election News : ईशान्येकडील छोटे राज्य असलेल्या त्रिपुरात येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होऊ शकते.
Cpm, congress, bjp News
Cpm, congress, bjp NewsSarkarnama

Tripura Election News : ईशान्येकडील छोटे राज्य असलेल्या त्रिपुरात येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होऊ शकते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विरोधी पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसशी आघाडी केली आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (MCP) आणि काँग्रेस (Congress) यांनी शुक्रवारी त्रिपुरातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. काँग्रेसचे सरचिटणीस अजय कुमार आणि माकपचे प्रदेश सचिव जितेंद्र चौधरी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. माकपच्या राज्य मुख्यालयात झालेल्या बैठकीत डाव्या आघाडीचे निमंत्रक नारायण कार हेही उपस्थित होते.

Cpm, congress, bjp News
Pune News : बोलता येत नसतांनाही बंडातात्यांनी केलेली सूचना पाहून फडणवीस झाले भावूक

कुमार यांनी बैठकीनंतर सांगितले की, 'काँग्रेसची एक टीम सीपीआयच्या राज्य सचिवांशी रणनीती आखण्यासाठी आणि जागा निश्चित करण्यासाठी चर्चा करणार आहे. विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवणार असल्याचे दोन्ही पक्षांनी सांगितले. लोकांना भाजपची राजवट संपवायची आहे, अशा परिस्थितीत जनतेच्या इच्छेचा आदर करत आम्ही एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

त्यामुळे लढतीत रंग भरण्याची चिन्हे आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला ईशान्येकडील मेघालय, मिझोराम तसेच त्रिपुरा या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मात्र, त्रिपुरात प्रमुख सामना देशातील राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारात स्थापन झालेल्या डाव्या आघाडीने त्रिपुरात १९७८ ते ८८ आणि पुन्हा १९९३ ते २०१८ इतके काळ राज्य केले.

Cpm, congress, bjp News
महाराष्ट्रात भाजपच्या मिशन 45 च्या बाता; अन् विधान परिषदेच्या तीन मतदार संघात तीन तऱ्हा

१९९८मध्ये काँग्रेस व त्रिपुरा (Tripura) उपजातीय जुबा समिती यांची आघाडी सत्तेत आली होती. ही समिती नंतर २००२ मध्ये इंडिजिनस पीपल्स फ्रंटमध्ये विलीन झाली होती. त्यातून नवा राजकीय पक्ष निर्माण झाला. त्रिपुराच्या राजकारणावर माकपचे प्रदीर्घ काळ वर्चस्व राहिले. मात्र, गेल्या निवडणुकीत त्याला मोठा धक्का बसला. भाजपने (BJP) सत्ता परिवर्तन केले. आता पुन्हा एकदा भाजपच्या हातुन सत्ता हिरावण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in