हिमाचलमध्ये काँग्रेस राहिली बाजूला; बंडखोरांनीच भाजपला फोडला घाम

Himachal Pradesh News : विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांपैकी ३० टक्के आमदारांना वगळून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे.
BJP
BJP Sarkarnama

Himachal Pradesh News : विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांपैकी ३० टक्के आमदारांना वगळून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. मात्र, आता त्यांचे हेच धोरण चांगलेच अंगलट आले आहे. हिमाचलमध्ये विधानसभा (Himachal Pradesh) निवडणुकीत भाजपने (BJP) उमेदवारी देण्याचे नाकारल्यामुळे तब्बल 21 जणांनी बंडखोरी केल्याचे सांगण्यात येत आहे.

हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) थेट लढत होत आहे. काँग्रेसनेही निवडणुकीत जोरदार आघाडी घेतली आहे. मात्र, भाजपसमोर खरे संकट हे आपल्याच बंडखोरांचे आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. बंडखोरी केल्यामुळे भाजपने पाच नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीच.

BJP
दिग्गजांना धक्का देत भाजपने रवींद्र जडेजाच्या पत्नीला उतरवले मैदानात

या बंडखोरांमुळे काँग्रेस राहिली बाजूला, भाजपच्या नेत्यांनी पक्षाला अडचणीत आणले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 68 विधानसभेच्या जागा आहेत. त्यामध्ये जवळपास 21 ठिकाणी बंडखोरी झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका बंडखोर नेत्याला उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन केल्याची चर्चा आहे. त्या संदर्भातील व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामुळे या बंडखोरांचा भाजपला किती फटका बसू शकतो याचा अंदाज येतो.

BJP
राऊतांच्या मनात काय? फडणवीसांचे कौतुक, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांना भेटणार

काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीवरुन निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागा आहेत. त्यामध्ये बीजेपचे 21 बंडखोर निवडणूक लढवत आहेत. भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतरही बंडखोर नेते कृपाल परमार यांनी आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, असा आरोपही बघेल यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in