राजकारण तापलं! पंतप्रधानांच्या घराला आग; श्रीलंकेत तणाव वाढला

Shrilanka| Political crisis|श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर जारी
राजकारण तापलं! पंतप्रधानांच्या घराला आग; श्रीलंकेत तणाव वाढला
Sri Lanka Crisis, Sri Lankan political crisis, sri lanka economic crisis, Sri Lanka Crisis Latest News in MarathiTwitter/@ANI

Mahinda Rajapaksa house set on fire

नवी दिल्ली : श्रीलंकेतील (Sri Lanka) तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून तिथे गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी (९ मे) पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) यांनी विरोधकांच्या दबावाखाली राजीनामा दिल्यापासून देशभरात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. (Sri Lanka Crisis Latest News in Marathi)

राजपक्षे यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये रक्तरंजित चकमकी सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे काल श्रीलंकेतील हंबनटोटा येथे संतप्त आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली. सरकार समर्थकांच्या हिंसाचारात आतापर्यंत एका खासदारासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sri Lanka Crisis, Sri Lankan political crisis, sri lanka economic crisis, Sri Lanka Crisis Latest News in Marathi
आगडोंब! आंदोलकांनी माजी मंत्री अन् खासदाराचं घर जाळलं; तिघांचा मृत्यू

पोलिसांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा दिल्यानंतर परिस्थिती अजूनच चिघळली आहे. श्रीलंकेत सैन्याला पाचारण करम्यात आलं आहे. श्रीलंकेत सर्व शहरांमध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आंदोलकांवर अश्रुधुराचा आणि बळाचा वापर करत आहेत.

पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या एका खासदाराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आता एक खासदार आणि माजी मंत्र्याचं घर आंदोलकांनी पेटवून दिल्याचे समोर आले आहे. दोघांचीही घरं जळून खाक झाली आहेत.

सरकारविरोधात देशातील नागरिक अधिकच आक्रमक झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. राजधानी कोलंबोसह अनेक ठिकाणी हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून आतापर्यंत एका खासदारासह तिघांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 150 जण जखमी झाले आहेत. सरकारसमर्थकांकडूनही आंदोलकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळत चालला आहे. त्यामुळे कोलंबोमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी माजी मंत्री जॉन्सन फर्नांडो आणि खासदार सनथ निशांत यांची घरं पेटवून देण्यात आली.

दरम्यान श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांसाठी केंद्र सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. +94-773727832 आणि ईमेल आयडी cons.colombo@mea.gov.in यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.