Delhi Municipal Corporation : महापालिकेत आप अन् भाजप नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी; नेमकं काय घडलं?

BJP and AAP : या हाणामारीनंतर थेट पोलिसांनाच यामध्ये हस्ताक्षेप करावा लागला
Delhi Municipal Corporation
Delhi Municipal Corporation Sarkarnama

Delhi News : दिल्ली महानगरपालिकेमध्ये आज पुन्हा एकदा आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मतमोजणी सुरु असताना हा प्रकार घडला. यावरूनच पुन्हा एकदा आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की करत एकमेकांचे केस ओढल्याचे समोर आले आहे. या राड्यादरम्यान काही नगरसेवक बेशुद्धही पडल्याचे दिसून आले आहे.

Delhi Municipal Corporation
Chinchwad By-Election : लोकसभेसोबतच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका लागतील : अजितदादांचा अंदाज!

नेमकं काय घडलं? :

आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मतमोजणी सुरु असताना हा प्रकार घडला. तर याआधीही महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान राडा झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार राडा झाला.

दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडीसाठी मतमोजणी सुरू असताना भाजपने एक मत अवैध ठरविण्यास हरकत घेतली. तसेच भाजप नगरसेवकांनी फेरमतमोजणी होऊ देणार नाही, अशी भूमीका घेतली.

Delhi Municipal Corporation
Delhi MCD Election: भाजप-आप नगरसेवकांमध्ये राडा ; बाटल्या फेकल्या ; महापौरांवर हल्ला..; व्हिडिओ व्हायरल

त्यामुळे मतमोजणी सुरु असतानाच भाजप आणि आपच्या नगरसेवकांमध्ये वाद झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. पुरुषांबरोबरच महिला नगरसेविकाही एकमेकांना मारहाण करत असल्याचे पाहायला मिळाले. या हाणामारीनंतर थेट पोलिसांनाच यामध्ये हस्ताक्षेप करावा लागला.

Delhi Municipal Corporation
Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल 'मातोश्री'वर जाणार, विरोधकांची मोट बांधणार?

दरम्यान, या वादानंतर महापौर शेली ओबेरॉय यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या, ''एक बाजू फेरमोजणीसाठी तयार आहे. मात्र, दुसरी बाजू तयार नाही. त्यामुळे आता मी फेरमोजणी करत नाही'', असं त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in