धक्कादायक : श्रीलंकेत सरकारविरोधी आंदोलकांवर हल्ले करण्यासाठी कैद्यांचा वापर

जनतेतील सरकारबद्दलचा रोष आणखी वाढला
Sri Lanka Crisis
Sri Lanka Crisis

कोलंबो : श्रीलंकेत (Sri Lanka) सरकारविरोधी आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष (President) गोटाबया राजपक्ष (Gotabay Rajapaksa) यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर हल्ले करण्यासाठी कैद्यांचा वापर करण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. यामुळे जनतेतील सरकारबद्दलचा रोष आणखी वाढला आहे. या प्रकरणी अखेर कारागृह प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. (Sri Laka Crisis News Updates)

अध्यक्ष राजपक्ष यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर हल्ले करण्यात आले होते. या हल्लेखोरांमध्ये तुरुंगातील कैद्यांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीलंका कारागृह प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. महिंदा राजपक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात नऊ जण ठार तर दोनशेपेक्षा अधिक जखमी झाले. कारागृह आयुक्त तुषारा उपुलदेनिया यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

Sri Lanka Crisis
माझा दिल्लीत गॉडफादर नाही! हार्दिक पटेलांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

वाटरेका खुल्या कारागृहातील कैद्यांच्या एका गटाचा या हल्ल्यात वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओत स्थानिक नागरिकांना काही हल्लेखोरांना ताब्यात घेताना दिसत आहे. हे वाटरेका खुल्या कारागृहातील कैदी असल्याचे समोर येत आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची पँट ही हल्लेखोरांनी घातलेल्या पँटसारखीच असल्याचे निदर्शनास आले आहे.

Sri Lanka Crisis
चंद्रकांतदादांचा पुण्यात राष्ट्रवादीसह मनसेला दे धक्का!

पंतप्रधानपदाचा (Prime Minister) महिंदा राजपक्ष (Mahinda Rajpaksha) यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर राजपक्ष हे कुटुंबीयांसह नौदल तळावर लपून बसले आहे. यातच आता न्यायालयाने राजपक्ष यांना न्यायालयानं दणका दिला आहे. राजपक्ष यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतर 15 राजकीय सहकाऱ्यांना देश सोडण्यास मनाई केली आहे. कोलंबोतील न्यायदंडाधिकारी न्यायालयानं हा आदेश दिला आहे. सरकारविरोधी आंदोलकांवर बळाचा वापर करून हिंसाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने राजपक्ष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना हा दणका दिला आहे. यासोबत या हिंसाचाराचा तपास करण्याचे आदेशही न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत.

श्रीलंकेत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हल्ले झाले होते. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी याला प्रत्युत्तर दिले. यातून हिंसाचार होऊन 9 जणांचा मृत्यू तर मोठ्या प्रमाणात मालमत्तेची जाळपोळ आणि नुकसान करण्यात आले होते. न्यायालयाच्या मनाई आदेशामुळे राजपक्ष, त्यांचा राजकारणी मुलगा अमल आणि इतर 15 सहकाऱ्यांना देश सोडता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com