मोदी सत्तेत आल्यापासून 177 आमदार-खासदारांचा काँग्रेसला रामराम

पंजाबमधील राजकीय संकटात माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंगही काँग्रेसमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे.
Congress
Congress File Photo

नवी दिल्ली : सत्ता असल्यानंतर पक्षांसाठी सर्वकाही चांगलंच घडत असतं. पण सत्ता गेल्यानंतर चांगले दिवस जातात, असं म्हणतात. काँग्रेसच्या बाबतीत नेमकं हेच घडलं आहे. 2014 मध्ये सत्ता गेल्यानंतर मागील सात वर्षांत देशभरातील 177 आमदार व खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ही रांग अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. पंजाबमधील राजकीय संकटात माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंगही काँग्रेसमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या निवडणूक हक्कांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने काही दिवसांपूर्वी प्रसिध्द केलेल्या अहवालात ही माहिती जाहीर केली आहे. 2014-2021 या सात वर्षांत दलबदलू आमदार व खासदारांची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. त्यानुसार सर्वाधिक धक्के काँग्रेसला बसले आहेत. काँग्रेसच्या 177 लोकप्रतिनिधींनी पक्ष सोडला आहे. गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांचा समावेश केल्यास हा आकडा 178 वर जातो.

Congress
आमदारकी वाचवेल त्या पक्षात जाऊ; 'त्या' सहा आमदारांचा काँग्रेसला इशारा

भाजप सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या केवळ 33 एवढी आहे. 2014-21 मध्ये पुन्हा निवडणूक लढणाऱ्या 500 पैकी 173 आमदार व खासदार आपला पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर काँग्रेसमध्येही 61 लोकप्रतिनिधींनी काँग्रेसमध्ये येऊन पुन्हा निवडणूक लढविली आहे. तृणमूल काँग्रेसमध्येही 31 जण दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 25 आमदार व खासदारांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.

काँग्रेस सोडून जाणाऱ्या आमदार व खासदारांच्या तुलनेत इतर पक्षांतून काँग्रेसमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मागील सात वर्षांत काँग्रेसमध्ये केवळ 61 आमदार व खासदार दाखल झाले आहेत. त्याचवेळी भाजपमधील ही संख्या काँग्रेसपेक्षा जवळपास तिप्पट आहे.

Congress
धक्कादायक : हवाई दलातील बलात्कारपीडित महिला अधिकाऱ्याचा असाही छळ

भाजपमध्ये 173 आमदार-खासदार आले आहेत. निवडणुकीच्या काळात पक्ष सोडणाऱ्या उमेदवारांची संख्या काँग्रेसचीच सर्वाधिक आहे. काँग्रेसमधून 222 उमेदवारांनी ऐन निवडणुकीत पक्ष सोडला. भाजपमधील उमेदवारांचा आकडा केवळ 111 एवढा आहे. तर काँग्रेस पाठोपाठ 153 उमेदवार बहुजन समाज पक्षाचे आहेत.

काँग्रेसमधील या बड्या नेत्यांनी सोडला पक्ष

- सुश्मिता देव (16 ऑगस्ट 2021)

- अभिजित मुखर्जी (5 जुलै 2021)

- जितिन प्रसाद (9 जून 2021)

- ज्योतिरादित्य शिंदे (11 मार्च 2020)

- प्रियांका चतुर्वेदी (19 एप्रिल 2019)

- राधाकृष्ण विखे पाटील (जून 2019)

- नारायण राणे (21 सप्टेंबर 2017)

- एस. एम. कृष्णा (29 जानेवारी 2017)

- रीटा बहुगुणा (20 ऑक्टोबर 2016)

- हेमंत बिस्वा शर्मा (29 ऑगस्ट 2015)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com