Punjab Election Results : पंजाबमध्ये आपची बल्ले बल्ले; सिद्धू, कॅप्टन पिछाडीवर

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) मोठी आघाडी घेतली घेतली आहे.
AAP, BJP and Congress | Punjab Assembly Election 2022 Live Updates | Punjab election result live updates
AAP, BJP and Congress | Punjab Assembly Election 2022 Live Updates | Punjab election result live updates Sarkarnama

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरूवात झाली असून पंजाबमध्ये एक्झिट पोल (Exit Poll) नुसारच कल दिसत असून आपने (AAP) पंजाबमध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. पंजाबमधील 117 जागांमधील 108 जागापौकी 77 जांगावर आपने आघाडी घेतली असून सत्तेत असलेल्या काँग्रेसला (Congress) 18 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिरोमणी आकाली दलाला 8 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपने 4 जागेवर आघाडी घेतल्याचे सुरूवातीचे चित्र आहे. मात्र, पंजाब काँग्रेसचा महत्वाचा चेहरा असलेले नवज्योतसिंग सिद्धू हे त्यांच्या पारंपारिक मतदारसंघ अमृतसर (पूर्व) येथून उमेदवार त्यांना आकाली दलचे (एसएडीच्या) बिक्रम मजिठियाला कडवी टक्कर देत असून सिद्धू पिछाडीवर गेले आहेत. तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपच्या उमेदवारामे घाम फोडला असून त्यांना पिछाडीवर टाकले आहे. (Punjab Assembly Election 2022 Live Updates)

AAP, BJP and Congress | Punjab Assembly Election 2022 Live Updates | Punjab election result live updates
पंजाबमध्ये आपची मोठी आघाडी तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी

पंजाबमधील (Punjab Election 2022) २२ जिल्ह्यातील सर्व ११७ जागांवर 20 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. पंजाबमध्ये एकाच टप्यात मतदान झाले असून आज (ता.10 मार्च) निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात कॉग्रेसला आपची टक्कर आहे. निवडणुकीत भाजप हा शिरोमणी अकाली दलापासून वेगळा झाला आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) नवे राजकीय भागीदार म्हणून भाजपसोबत आहेत. पण त्याचा काही परिणाम निवडणुकीत झालेला दिसत नसल्याचे सुरूवातीच्या निकालावरून दिसत आहे.

AAP, BJP and Congress | Punjab Assembly Election 2022 Live Updates | Punjab election result live updates
Goa Election:निकालापूर्वीच कॉग्रेसने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची वेळ मागितली..

7 मार्चला 'एनडीटीव्ही'ने विविध एक्झिट पोलच्या केलेल्या सरासरीमध्ये काँग्रेसची पंजाबमधील सत्ता जाताना दिसत असल्याचे म्हटले होते. राज्यात काँग्रेसला जवळपास 50 जागांचे नुकसान होत असून केवळ 27 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली होती. तर आप 70 जागांच्या जवळपास पोहचत राज्यात सत्ता मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत आपला केवळ 20 जागा मिळाल्या होत्या. मात्र, दिल्लीनंतर आपला पंजाबमध्ये सत्ता मिळणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com