पंतप्रधान मोदींना मिळालेल्या वस्तूंच्या लिलावात एका भाल्याने केली कमाल!
PM Narendra Modi

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या वस्तूंच्या लिलावात एका भाल्याने केली कमाल!

पुणे मेट्रोच्या स्मृतिचिन्हाला 104 बोली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या ई-लिलावाचा गुरूवारी शेवटचा दिवस होता. या लिलावामध्ये 1348 भेटवस्तू होत्या. या वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये मोठी उत्साह दिसून आला. अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती, सरदार पटेल यांची मुर्ती, लाकडी गणपती, पुणे मेर्टोचे स्मृतिचिन्ह, तलवार आदी वस्तूंचा समावेश होता. पण त्यावर एक भाला सरस ठरला. या भाल्याला लिलावात सर्वाधिक दीड कोटींची बोली लागली.

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू व स्मृतिचिन्हांच्या ई-लिलावाचा तिसरा टप्पा 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर यादरम्यान पार पडला. www.pmmementos.gov.in या संकेस्थळाद्वारे ऑनलाईन बोली लावण्यात येत होती. ई-लिलावात मिळणारा निधी नमामी गंगे मिशन (Namami Gange Mission) साठी दिला जातो. गंगा नदीचा कायापालट करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा लिलाव करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.

PM Narendra Modi
शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्या वरूण गांधींना भाजपनं दिला डच्चू!

तिसऱ्या टप्प्यातील लिलावामध्ये 1348 वस्तूंचा समावेश होता. या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाले. यातील मुख्य वस्तूंमध्ये नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या भारतीय खेळाडूंच्या वस्तूंचाही समावेश होता. अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती, वाराणसी येथील रुद्राक्ष सभागृह, सरदार पटेल यांची मूर्ती, लाकडी गणेश मुर्ती, पुणे मेर्टोचे स्मृतिचिन्ह, विक्ट्री फ्लेम आदी वस्तूंचा समावेश होता.

या वस्तूंमध्ये सर्वाधिक किंमत टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नीरज चोपडा याने पंतप्रधान मोदींना भेट दिलेल्या भाल्याला मिळाली. या भाल्याला सर्वाधिक दीड कोटी रुपयांची बोली लागली. त्याखालोखाल ऑलिम्पिकपटू भवानी देवीची सही केलेल्या तलवारीला सव्वा कोटी, सुमित अंतिल यांच्या भाल्याला सुमारे एक कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लागली. लवलीना बोरगोहेन हिच्या बॉक्सिंग ग्लोवजला 91 रुपयांची बोली लागली.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदी हे `बिग बूल` झुनझुनवालासमोर उभे का?

पुणे मेट्रोच्या स्मृतिचिन्हाला 104 बोली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या स्मृतिचिन्हाला 104 बोली लागल्या आहेत. तसेच सरदार पटेल यांच्या मुर्तीला 140, लाकडी गणेश मुर्तीला 117 तर विक्ट्री फ्लेम च्या स्मृतिचिन्हाला 98 बोली लागल्या आहेत. या ई-लिलावामध्ये लागलेल्या बोलीतून मिळणारा निधी नमामी गंगे योजनेसाठी दिली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in