Dr. Manmohan Singh
Dr. Manmohan SinghSarkarnama

मनमोहनसिंग यांनी सोळा हजार जणांना मायदेशी आणलं, तेही जाहिरात न करता!

रशियाने युक्रेनविरोधात युध्द (Russia -Ukraine War) पुकारल्याने हजारो भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे.

नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनविरोधात युध्द (Russia -Ukraine War) पुकारल्याने हजारो भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. आतापर्यंत मंगळवारी सकाळपर्यंत सात विमानांतून सुमारे दीड हजार जणांना परत आणण्यात आले आहे. ऑपरेशन गंगा नावाने सुरू असलेल्या या मोहिमेवरून भाजप नेत्यांकडून उत्तर प्रदेशातील प्रचार सभांमध्येही गवगवा केला जात आहे. केंद्रीय मंत्री विमानतळांवर जाऊन भारतीयांचे स्वागत करत आहेत. अनेकजण पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) कौतूक करत आहेत. पण हे सुरू असताना सोशल मीडियात मात्र माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांचीही चर्चा सुरू आहे.

युक्रेनमध्ये (Ukraine) शिक्षणासाठी गेलेले हजारो विद्यार्थी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारकडून त्यांना परत आणण्यासाठी विशेष विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच युक्रेन शेजारील देशांमध्ये समन्वय साधण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना या देशांमध्ये पाठवण्यात येणार आहे. भारतीय दुतावासाकडून विद्यार्थ्यांना सतत आश्वस्त केलं जात आहे. या संपूर्ण मोहिमेची चर्चा आता उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही रंगली आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपच्या नेत्यांकडून सभांमध्ये याचा उल्लेख करत देशात मजबूत सरकार हवे असल्याचे सांगून भाजपला निवडून देण्याचे आवाहन केलं जात आहे.

Dr. Manmohan Singh
युक्रेन राष्ट्राध्यक्षांची पत्नी रणांगणात; भावनिक पोस्टनं वेधलं जगाचं लक्ष

मोदी सरकारच्या या मोहिमेचं अनेकांकडून सोशल मीडियातही कौतूक केलं जात आहे. पण सध्या माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी लीबिया संघर्षावेळी मनमोहनसिंग सरकारने केलेल्या कामगिरीची आठवण काढली आहे. त्यावेळी लीबियातून 16 हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात आले होते. पण त्याचा कुठेही गवगवा केला नाही, असा सुर सोशल मीडियात आहे.

काँग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांसह अनेक नेटकऱ्यांनी याबाबतचे ट्विट केलं आहे. मोदी सरकारने 219 विद्यार्थ्यांना मायदेशी आणलं तर त्याचं भांडवल केलं जात आहे. पण कोणताही जाहिरातबाजी न करता मनमोहनसिंग सरकारने 16 हजार भारतीयांना लीबियातून मायदेशी आणलं होतं, असं लिहिलेली एक इमेज बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिने ट्विटरवर शेअर केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. हजारो भारतीय अडकलेले असताना 150 जण मायदेशात परतल्याची जाहिरात सुरू आहे, असं राऊत म्हणाले होते. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मंत्रालयाच्या अॅडव्हायझरीनंतर सुमारे आठ हजार भारतीयांना युक्रेन सोडल्याची शक्यता आहे. भारतीयांना पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया, रोमानिया आणि मोल्दोव्हा या देशांमध्ये समनव्य साधूनच जावे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com