लडाखमध्ये २६ जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत कोसळले; ७ जवान ठार, इतरांची प्रकृती गंभीर
seven soldiers killed In Ladakh

लडाखमध्ये २६ जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत कोसळले; ७ जवान ठार, इतरांची प्रकृती गंभीर

लडाख (Ladakh) प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे (Indian Army) वाहन श्योक नदीत पडले आहे.

नवी दिल्ली : लडाख (Ladakh) प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे (Indian Army) वाहन श्योक नदीत पडले आहे. या अपघातात सात जवानांचा आतापर्यंत मृत्यू (seven soldiers killed) झाला आहे. या अपघातात अनेक जवान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (seven soldiers killed In Ladakh)

seven soldiers killed In Ladakh
नवाब मलिकांमुळे आज किंग खानला शांत झोप लागेल...

लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 'परतापूरच्या संक्रमण शिबिरातून 26 जवानांचा एक तुकडी उप-सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड एरियाकडे जात होता. थोईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. वाहन सुमारे 50-60 फूट खाली पडले. सर्व 26 जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली आहे.

seven soldiers killed In Ladakh
आर्यनला क्लिनचिट मिळताच मलिकांनी पुन्हा वानखेडेंवर साधला निशाणा

आतापर्यंत २६ पैकी ७ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. इतर जवानांनाही गंभीर दुखापत झाली आहे. इतर जवानही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहे. ज्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हवाई मार्गाने रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in