काँग्रेसवर नामुष्की! पोटनिवडणुकीतील उमेदवाराला 'नोटा'पेक्षाही कमी मते

विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोेठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.
Congress
CongressSarkarnama

मुझफ्फरनगर : विधानसभा पोटनिवडणुकीत बिहारमध्ये (Bihar) विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (RJD) बोचहां मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. आरजेडीचे अमरकुमार पासवान हे विजय झाले असून, त्यांनी भाजप;d/e (BJP) उमेदवाराचा 36 हजार मतांनी विजय मिळवला आहे. याचवेळी काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला नोटापक्षेाही कमी मते मिळाली आहेत. (By-Election News Updates)

दिवंगत आमदार मुसाफिर पासवान यांचे पुत्र अमरकुमार यांना तिकीट देण्याची खेळी आरजेडीने खेळली होती. त्यांना 82 हजार 562 मते मिळवून विजय मिळवला आहे. असे असले तरी सर्वाधिक चर्चा काँग्रेसच्या उमेदवाराची होत आहे. काँग्रेसचे तरुण चौधरी यांना केवळ 1 हजार 336 मते मिळाली आहेत. ही मते नोटापेक्षाही कमी आहेत. या पोटनिवडणुकीत नोटाला 2 हजार 967 मते मिळाली आहे. म्हणजेच नोटाला मिळालेली मते ही काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या दुप्पट आहेत. यामुळे काँग्रेसला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहेत.

Congress
पोटनिवडणुकांत भाजपला आणखी एक धक्का! पक्षाच्या उमेदवाराचा 36 हजार मतांनी पराभव

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी मंत्री रमाई राम यांच्या कन्या गीता कुमारी यांना तिकीट दिले होते. त्यांना 45 हजार 909 मते मिळाली. पासवान यांनी कुमार यांचा तब्बल 36 हजार मतांनी पराभव केला आहे. सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनला दलाला आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. भाजपला पश्चिम बंगालमधील बालीगंज, महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतही फटका बसला आहे.

Congress
केेंद्रीय मंत्रिपद अन् खासदारकीवर पाणी सोडल्यानंतर अखेर मिळवली आमदारकी!

विकासशील इन्सान पार्टीचे आमदार मुसाफिर पासवान यांच्या मृत्यूमुळे बोचहां मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बेबी कुमारी यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्या विरोधात आरजेडीने अमरकुमार पासवान यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत 59.20 टक्के मतदान झाले होते. एकूण 2 लाख 90 हजार 544 मतदारांनी मतदान केले होते. या पोटनिवणुकीत तीन महिलांसह 13 उमेदवार रिंगणात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com