Indigo Airlines च्या विमानात तीन प्रवाशांकडून एअरहोस्टेसचा विनयभंग, पायलटला मारहाण

गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या विमानात एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत एअरहोस्टेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
Indigo Airlines
Indigo Airlines

Indigo Airlines : गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत एअरहोस्टेसवर लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आता दिल्लीहून पाटण्याला येणा-या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात तीन तरुणांनी एअरहोस्टेसचा विनयभंग करत पायलटलाही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) च्या जवानांनी 2 आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याचा तिसरा साथीदारही सध्या फरार असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना रविवारची (8 जानेवारी 2023) आहे. धक्कादायक विमानात गोंधळ घालणाऱ्या या तिघांनी आपण  बिहारमधील सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या जवळचे असल्याचाही दावा केला आहे.

Indigo Airlines
Laxman Dhobale: ''..यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही..''; लक्ष्मण ढोबळेंची मोठी घोषणा!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाने दिल्ली विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर 3 प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विमानात बसलेल्या इतर लोकांना तिघेही दारूच्या नशेत असल्याचा संशय होता. प्रवाशांनी तिघांना शांत राहण्यास सांगताच त्यांच्यात भांडण सुरू झाले. एअर होस्टेस आणि इतर क्रू मेंबर्सही तिघांना समजावण्यासाठी आले असता या तिघांनी त्यांच्याशीही गैरवर्तन केले. यादरम्यान तिघांवरही विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. संपूर्ण प्रवासात तिघेही गोंधळ घालत राहिले. आरोपींनी पायलटसोबतही बाचाबाची केल्याचे आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

या गोंधळाची माहिती पटनाच्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानातूनच देण्यात आली. सुरक्षा दल अगोदरच सतर्क होते आणि उतरताच दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांनी मद्यप्राशन केल्याची पुष्टी झाली. त्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी दोघांनाही विमानतळ पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. नितीश आणि रोहित अशी दोघांची ओळख पटली आहे. हे दोघेही बिहारमधील हाजीपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

इंडिगो एअरलाइन्सच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर पळून गेलेल्या पिंटू नावाच्या तिसऱ्या प्रवाशाचा पोलीस शोध घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com