Former PM Imran khan: पाकिस्तानात राजकारण तापलं; माजी पंतप्रधान इमरान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

Former PM Imran khan: पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Former PM Imran khan
Former PM Imran khanSarkarnama

Former PM Imran khan: पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. तोशाखाना प्रकरणी इम्रान खानविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे अटक वॉरंट घेऊन लाहोर पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते. त्याचवेळी इम्रान खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यानंतर गदारोळ होण्याची भीती आहे.

इस्लामाबादच्या महानिरीक्षकांनी इम्रान खान यांना अटक करण्याचे आदेश जारी केले आहेत. पाकिस्तानी मीडियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबादमधून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांनी रविवारी दुपारी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना लाहोरमधील जमान पार्क येथे पोहोचण्याचे आवाहन केले होते. तोशाखाना प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीत वारंवार गैरहजर राहिल्यामुळे इम्रान खान यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Former PM Imran khan
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी; कार्यकर्त्यांकडून मोठे शक्तीप्रदर्शन

दरम्यान पाकिस्तानच्या माजी सूचना मंत्र्यांनी एका ट्विटमधून 'इमरान खान यांना अटक करण्याचा कोणताही प्रयत्न परिस्थिती आणखीच बिघडवू शकतो. अशी शक्यता वर्तवली आहे. पाकिस्तानला आणखी अडचणीत आणू नका आणि समजूतदारपणे वागा असा इसा" फवाद पुढे म्हणाले की, इम्रान खान यांच्यावर ७४ गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्षपणे न्यायालयात हजर राहणे मानवी दृष्ट्या शक्य नाही. पंजाबमधील आगामी सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्याच्या उद्देशाने इम्रान खान यांच्या अटकेचा हेतू असल्याचा दावाही फवाद चौधरी यांनी केला आहे.

तोशाखाना नावाच्या सरकारी डिपॉझिटरीतून मिळालेल्या भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप इम्रान खानवर होता. गेल्या आठवड्यात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते हजर राहणार होते, मात्र हजर राहू शकले नाहीत. दिवसभरात तीन न्यायालयांना भेट दिल्यानंतर सुनावणीसाठी हजर राहण्यास उशीर झाल्याने वॉरंट रद्द करण्यासाठी ते न्यायालयात जातील, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले होते. अटक वॉरंटमध्ये इम्रान यांना ताब्यात घेतल्यानंतर 7 मार्चपर्यंत न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in