इमरान खान सरकार कोसळताच महिला पत्रकाराला अटलबिहारी वाजपेयींची आठवण

Pakistan | Imran khan| Atal Bihari Vajpayee | पाकिस्तानच्या 342 सदस्यांच्या संसदेत 174 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान केले.
Pakistan | Imran khan|
Pakistan | Imran khan|

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आणि काही क्षणात इमरान खान यांचं सरकार कोसळलं. इम्रान खान यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षानंतर खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. शनिवारी (9 एप्रिल) रात्री पाकिस्तानच्या संसदेत 174 सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने म्हणजेच इमरान खान यांच्या विरोधात मतदान आणि काही क्षणात खान यांचं सरकार कोसळलं.

Pakistan | Imran khan|
प्रदेशाध्यक्षांवर मोठी नामुष्की; पोटच्या मुलानेच धरला विरोधी पक्षाचा हात

पाकिस्तानच्या 342 सदस्यांच्या संसदेत 174 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान केले. तर खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी या मतदान प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला. पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या दरम्यान, पाकिस्तानच्या महिला पत्रकार नायला इनायत (Naila Inayat) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडिओची चर्चा रंगली लागली आहे.

नायला इनायत (Naila Inayat) यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचा संसदेतला एक व्हिडिओ शेअर केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा 1996 मधला संसदेतील भाषणाचा हा व्हिडिओ आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर 1996 मध्ये सभागृहात राजीनामा देण्याची घोषणा केली होती, त्यावेळचा हा व्हिडिओ नाइला इनायत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघांच कर्णधारपद भूषवलेले इमरान खान दोन दशकांपूर्वी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाची स्थापना केली. भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचं आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचे आश्वासन देत 2018 ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या अडचणीही वाढतच गेल्या. गेल्या वर्षी मार्च महिन्यात अनेक नेत्यांनी इमरान खान यांच्या पक्षातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा राजकीय संघर्ष सुरू झाला.

दरम्यान सत्तेतून पायउतार होताना इमरान खान यांनी भारताचे तोंडभर कौतुकही केले. भारताचे कौतुक करताना इमरान खान म्हणाले, पाकिस्तान भारतासोबत स्वतंत्र झाला होता. क्रिकेटमुळे मला तिथे खूप मान मिळाला, प्रेम मिळाले. भारतीय हा निस्वार्थी देश आहे. केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे आणि भारत सरकारने काश्मीरबाबत जे काही केले आहे त्यामुळे आमचे संबंध बिघडले. माझे भारताशी शत्रुत्व नाही. आज जगातील कोणत्याही देशामध्ये भारताला आपल्या परराष्ट्र धोरणाचे ज्ञान देण्याची हिंमत नाही. भारत सर्व निर्बंधांना न जुमानता रशियाकडून तेल खरेदी करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com