Supreme Court hearing : सत्तासंघर्षावरील निर्णयासंदर्भात सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान; युक्तीवाद लवकर पूर्ण करण्याची सूचना

Shivsena News : शिवसेनेच्या वकिलांना युक्तीवाद पूर्ण करण्याची न्यायाधीशांची सूचना
Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Eknath Shinde, Uddhav Thackeray NewsSarkarnama

Supreme Court hearing News : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. न्यायालयात शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने युक्तीवाद सुरु आहे. शिंदे गटाचे ज्येष्ट वकिल निरज किशन कैल युक्तीवाद करत आहेत.

न्यायालयामध्ये शिवसेनेच्या (Shivsena) वतीने युक्तीवाद सुरु आहे. मात्र, या दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, आम्हाला ही सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. वेळेत युक्तीवाद झाले तर होळीच्या सुट्टीपूर्वी हे प्रकरण संपवायचे आहे. तसेच न्यायाधीशांनी कौल यांना आपला युक्तीवाद पूर्ण करण्याची सूचना केली. तसेच शिवसेनेच्या इतर वकिलांनी उद्यापर्यंत युक्तीवाद पूर्ण करावा, असेही न्यायाधीशांनी सांगितले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Supreme Court Hearing : विधानसभा अध्यक्षांबाबत सरन्यायाधीशांचा महत्त्वपूर्ण सवाल; म्हणाले...

त्यामुळे होळीच्या सुट्टीपूर्वी ही सुनावणी पूर्ण होऊन निकाल येवून शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कौल आपल्या युक्तीवादात म्हणाले, पक्षातील असंतोष म्हणजे फूट नाही. काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीची (Ncp) विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत (Shivsena) कधीच असंतोष नव्हता. आमचा आघाडीला विरोध होता. आम्ही शिवसेना आहोत. आम्हाला तशी मान्यता मिळाली आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.

अजून आमदारांवर कसलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आमदारांना मतदान करण्यापासून रोखता येणार नाही. ते अपात्र ठरले तर त्यांनी निर्णय किंवा त्या निर्णयावर केलेले मतदान अपात्र कसे ठरवणार, असा सवालही कौल यांनी उपस्थित केला. बहुमत आणि व्हीप पाहून अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असाही युक्तिवाद कौल यांनी केला.

Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Supreme Court hearing : ...म्हणून आम्ही राज्याबाहेर गेलो; शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले कारण

विधिमंडळाचे सदस्य त्यांच्या राजकीय अधिकारांनुसार प्रतोद नियुक्ती करतात. त्यानुसार आम्ही त्या प्रतोदाच्या व्हीपचे पालन केले, असे कौल यांनी सांगितले. यावर न्यायाधीशांनी विचारले कोणता व्हीप पाळणार. खरे तर विधिमंडळ पक्षाने नेमलेल्या प्रतोदच्या व्हीपचे पालन व्हावे लागते. मात्र, इथे एकाच वेळी दोन व्हीप अस्तित्वात आहे. मग तुमच्यामते बहुसंख्य सदस्यांनी नेमलेल्या प्रतोदचा व्हीपचे पालन व्हायला हवे का, असा सवाल न्यायाधीशांनी केला. सध्या कौल यांचा युक्तीवाद सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com