देश टिकवायचा असेल तर...; राहुल गांधींचे विरोधी पक्षांना मोठे आवाहन

Rahul Gandhi| Congress| वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरचा जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे
Rahul Gandhi|
Rahul Gandhi|

नवी दिल्ली : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणी उभे राहिले तर त्याच्या विरोधात आक्रमण होते. इडी, सीबीआय सगळे पाठी लागतात. माझी ५५ तास चौकशी झाली. पण मला काही फरक पडत नाही. १०० तास चौकशी करा. पण आज आपण उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही, हा देश या देशातील जनतेचे भविष्य आहे. हा देश दोन उद्योगपतींचा नाही.' अशा शब्दांत कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे.

वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरचा जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस (Congress) चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्त्वात आज रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यात आले

Rahul Gandhi|
राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल; दोन उद्योगपतींशिवाय पंतप्रधान बनू शकत नाहीत

यूपीए सरकारच्या कार्यकाळात दहा वर्षात २७ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. पण मोदी सरकारने आठ वर्षात त्यांना पुन्हा गरिबीत ढकलले. देशाला मोदी मागे घेऊन जात आहेत. देशाला कमजोर करत आहेत. यूपीए सरकारने शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपये दिले आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काळे कायदे केले. यूपीए सरकारने मनरेगा हा कामगारांसाठी महत्त्वाचा कायदा दिला, नरेंद्र मोदींनी मनरेगाला कामगारांचा अपमान म्हटले. असेही राहुल गांधी यांनी नमुद केले

बेरोजगारी, द्वेषामुळे देश कमजोर होतो. पण काँग्रेसचा कार्यकर्ताच देशाला वाचवू शकतो. काँग्रेसच देशाला प्रगती पथावर आणू शकतो. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा देश सर्वांचा आहे. या देशातील नागरिकांनी त्यांचे आपले रक्त आणि घाम गळून देशाची प्रगती केली आहे. पण त्याचा फायदा आज काही निवडक लोकांनाच होत आहे. आपले संविधान हा देशाचा आत्मा आहे, तो वाचवण्याचे काम प्रत्येक भारतीयाला करावे लागेल. असे केले नाही तर हा देश टिकणार नाही. काँग्रेस 'भारत जोडो' यात्रा सुरू करत आहे. ही विचारधारेची लढाई आहे. काँग्रेस आणि देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन लढू, असे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in