आत्मसन्मान असेल तर काँग्रेस सोडा..ओवेसी यांचा आझाद यांना सल्ला 

"तुमच्यात आत्मसन्मान असेल लवकरच पक्ष सोडा," असा सल्ला असदुद्दीन ओवेसी यांनी गुलाम नबी आजाद यांना दिला आहे.
owaisi-ghulam-nabi-azad (1).jpg
owaisi-ghulam-nabi-azad (1).jpg

नवी दिल्ली : काँग्रेस नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर आता ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टिका केली आहे.

एआईएमआईएमच्या ऑनलाइन रैलीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ओवेसी यांनी राज्यसभेचे विरोधी पक्ष नेता आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यावर टिका केली आहे. आजाद यांनी काँग्रेस पक्ष सोडावा, असे ओवेसी यांनी म्हटलं आहे.

"तुमच्यात आत्मसन्मान असेल लवकरच पक्ष सोडा," असा सल्ला असदुद्दीन ओवैसी यांनी गुलाम नबी आजाद यांना दिला आहे. ओवेसी म्हणाले की आजाद यांनी एआईएमआईएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. आज काँग्रेसलाच लोक भाजपची कठपुतली म्हणतात.

काँग्रेसच्या नेतृत्वात बदलासाठी पत्र लिहणारे 23 नेते वादाच्या केंद्रस्थानी आले  आहेत. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना पक्षातूनच लक्ष्य केले जात आहे. यातील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. आझाद यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली त्यावेळी त्यांना केवळ 320 मते मिळाली होती, असा टोला उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्याने लगावला आहे. 

काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक नुकतीच झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. या बैठकीत हंगामी अध्यक्षपदावरुन मुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांनी समितीच्या सदस्यांनी केली होती. यावर मनमोहनसिंग आणि ए.के.अँटनी यांनी नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे सुचवले.

काँग्रेस नेत्यांच्या पत्राच्या मुद्द्यावरुन पक्षात दोन गट पडले आहेत. गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे अथवा राहुल यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट 2019 रोजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com