पंतप्रधान बनलात तर पहिले काम कोणते करणार, राहुल गांधीनी दिले 'हे' उत्तर...

संस्कृतींचा हा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती आपण जपली पाहिजे
Rahul Gandhi
Rahul Gandhi

चेन्नई : काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi) गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू (Tamilnadu) दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिवाळीही तामिळनाडूतील आपल्या निवासस्थानी काही विद्यार्थ्यांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींना, पंतप्रधान झाल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम काय कराल, असा प्रश्न विचारण्यात आला आणि या प्रश्नाला क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांची मने जिंकली. राहूल गांधीनी या भेटीचा एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरुन शेअर केला आहे.

Rahul Gandhi
वानखेडेंच्या मेव्हणीवर ड्रग्ज प्रकरणात गुन्हा? मलिकांच्या ट्विटने खळबळ

तामिळनाडूच्या दौऱ्यादरम्यान राहुल गांधीनी मूलगुमुडू येथील सेंट जोसेफ शाळेतील मुलांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भेट घेतली. संभाषणादरम्यान तुम्ही पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. यावर त्यांनी क्षणाचीही विलंब न लावता 'महिलांना आरक्षण देईन,' असं उत्तर दिलं. "जर मला कोणी विचारलं की तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार, तर मी त्यांना विनम्रता शिकवेन. विनम्रतेमुळे तुम्ही समजूतदार बनता,'' असंही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान राहुल गांधींनी ट्विटरवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते त्यांना भेटायला आलेल्या काही महिला शिक्षकांसोबत जेवण करताना दिसत आहेत. राहुल गांधींना त्यांच्या तामिळनाडूतील पाहूण्यांसाठी खास दिल्लीच्या जेवणाची व्यवस्था केली होती, यात त्यांनी छोले भटुरे आणि कुल्फी मागवली. “मित्रांच्या भेटीने दिवाळी आणखी गोड झाली, संस्कृतींचा हा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती आपण जपली पाहिजे,'' असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींच्या या भेटीनंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी भाऊबीजे निमित्त राहुल गांधी यांचा लहानपणीचा एक जुना फोटोट्विटरवर शेअर केला होता. यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ''माझा भाऊ प्रेमाने आणि धैर्याने सत्यासाठी लढत असल्याचा मला अभिमान आहे. प्रियंका गांधींनी खास फोटो शेअर करत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “ज्यावेळी माझ्या भावाने नेमबाजी स्पर्धेत बरीच पदके जिंकली होती, हा फोटो त्यावेळचा आहे”,असं म्हणत प्रियंका गांधीनी तुम्हा सर्वांनाही भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा असे लिहीत देशवासीयांना भाऊबीजेच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in