रशियानं झेलेन्स्की यांची हत्या केल्यास युक्रेनचा पुढचा प्लॅन तयार

रशियाने युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा प्रयत्न तीन वेळा केल्याचे नुकतेच समोर आले होते.
Volodymyr Zelenskyy
Volodymyr ZelenskyySarkarnama

कीव : रशियाने युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांना ठार मारण्याचा प्रयत्न तीन वेळा केल्याचे नुकतेच समोर आले होते. या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मोठा दावा केला आहे. रशियानं झेलेन्स्की यांची हत्या केली तरी युक्रेनकडे (Ukraine) पुढचा प्लॅन तयार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युध्दाचा सोमवारी बारावा दिवस असून अनेक शहरांमध्ये हल्ले सुरूच आहेत. (Russia Ukraine War)

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी रविवारी एका एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हा दावा केला आहे. एक दिवसांपूर्वी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री डिमित्रो कुलेबा यांना भेटल्याचे सांगत ब्लिंकन यांनी अधिक खुलासा करण्यास नकार दिला. झेलेन्स्की यांना रशियानं मारले तरी युक्रेनकडे सरकार कोणत्याही मार्गाने पुढे कायम ठेवण्यासाठी प्लॅन आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. झेलेन्स्की आणि सरकारने दाखवलेल्या धैर्याचंही त्यांनी कौतूक केलं.

Volodymyr Zelenskyy
फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर रशियानं घेतला मोठा निर्णय; भारतीयांनाही मिळणार दिलासा

दरम्यान, झेलेन्स्की यांना ठार मारण्यासाठी चेचेन बंडखोरांच्या विशेष दलाच्या कादिरोव्हिट्स या गटाला पाठविण्यात आले होते. या गटाचा खातमा केल्याचा दावा युक्रेनच्या नॅशनल सिक्युरिटी अँड डिफेन्स कौन्सिलचे सचिव ओलेस्की डॅनिलोव्ह यांनी नुकताच केला होता. अध्यक्षांना मारण्यासाठी पाठवलेल्या चेचेनच्या विशेष दलातील बंडखोरांना किव्हजवळील भागात ठार करण्यात आले. रशियन गुप्तहेर संघटनेच्या काही अधिकाऱ्यांकडूनच युक्रेनला या कटांची मिळाली होती, हेही समोर आले आहे.

रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला रशियाच्या गुप्तहेर संघटनांमधील काही अधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यांच्याकडूनच झेलेन्स्की यांना ठार मारण्याच्या कटांची माहिती युक्रेनला मिळत होती. यानुसार रशियन वॅगनर या भाडोत्री हल्लेखोरांच्या हालचालींचा अंदाज युक्रेनने घेतला होता. झेलेन्स्कीच्या सुरक्षा पथकाला याबद्दल अचूक माहिती मिळत होती. युक्रेनमध्ये युद्ध सुरू होण्याआधी झेलेन्स्की यांनी तेथून बाहेर काढण्याची तयारी अमेरिकेने दर्शविली होती. पण त्यांनी याला नकार देत कीवमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला होता. (Russia-Ukrain War Updates)

Volodymyr Zelenskyy
रशिया युक्रेन युद्ध काळात पुतीन यांचे एअर होस्टेससोबतचे फोटो व्हायरल

युक्रेनवरील हल्ल्याच्या बाराव्या दिवशी रशियाने (Russia) सोमवारी मोठी घोषणा केली आहे. भारतासह इतर देशांमधील नागरिकांना युक्रेनबाहेर पडता यावे यासाठी रशियाने राजधानी कीवसह चार शहरांमध्ये युध्दविरामाची घोषणा केली आहे. दुपारी साडेबारा वाजल्यापासून हा या शहरांमधील हल्ले थांबवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्या विनंतीनंतर कीव, खारकीव, सुमी आणि मारियुपोल या शहरांमध्ये हल्ला थांबवला जाणार आहे. दुपारी साडे बारा वाजल्यानंतर चार शहरांमध्ये मानवी कॉरिडॉर करण्यात येणार आहे. या कालावधीत अन्य देशांतील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडणे शक्य होणार आहे. भारताचेही अनेक विद्यार्थी व नागरिक या शहरांमध्ये अडकून पडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com