'सिद्धू मुसेवाला' प्रकरणातील दोन शार्प शुटर्सचा एन्काउंटर; पंजाब पोलिसांची कारवाई

Sidhu Moose Wala | अटारी सीमेवर पोलिस आणि मारेकऱ्यांमध्ये झालेल्या चकमकी
Sidhu musawala case News Updates, Pune Latest Marathi News
Sidhu musawala case News Updates, Pune Latest Marathi Newssarkarnama

अमृतसर : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या (Sidhu Moose Wala) मारेकऱ्यांमध्ये समावेश असलेल्या २ संशयित शार्प शुटर्सचा एन्काउंटर करण्यात आला आहे. आज (बुधवार) दुपारी अमृतसरच्या अटारी सीमेवर (Atari border) पोलिस आणि मारेकऱ्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. जगरूपसिंग रूपा आणि मनप्रित सिंह उर्फ मन्नू कुसा अशी ठार झालेल्या दोघांची नावं आहेत. या कारवाईदरम्यान तिघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांच्या दाव्यानुसार सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये जगरूप सिंग रूपा आणि मनप्रित सिंग उर्फ ​​मन्नू कुसा हे शूटर सहभागी होते आणि दोघेही घटनेनंतर फरार झाले होते. आज सकाळी हे दोघेही भकना गावात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. यानंतर चकमक सुरू झाली. सुमारे चार तास चाललेल्या ऑपरेशननंतर दोघांचाही एन्काउंटर करण्यात आला.

या कारवाईबाबत बोलताना डीजीपी गौरव यादव म्हणाले, "सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील फरार मनू आणि रूपा या दोन शार्प शुटर्सचा आज चकमकीत मृत्यू झाला आहे. शिवाय ३ पोलीस जखमी झाले असून त्यांची प्रकृती काळजी करण्यासारखी नाही. घटनास्थळावरून एके-47 आणि पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. घटनास्थळावरून एक बॅगही जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे."

सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी मानसा गावात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये २१ जून रोजी रुपा आणि कुसा मोगा जिल्ह्यातील सामलसरमध्ये दुचाकीवरुन फिरताना दिसून आले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार हल्ल्यावेळी एकूण सहा जणांची उपस्थिती होती. दोन गटांमध्ये (मॉड्यूल) या सहा जणांनी मुसेवालाची हत्या केली, असा पोलिसांचा दावा आहे.

याशिवाय, दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने यापूर्वी प्रियव्रत फौजी, कशिश आणि अंकित सिरसा या तीन शूटर्संना अटक केली आहे.

रुपा आणि कुसा हे दुसऱ्या मॉड्यूलचे भाग होते. २९ मे रोजी रुपा आणि कुसा यांनी मानसा जिल्ह्यातील जवाहक गावापर्यंत मुसेवालाच्या गाडीचा पाठलाग केला होता. हे दोघेही टोयोटा कोरोलामध्ये होते. कुसाने मुसेवाला यांच्यावर गोळी झाडली होती. हत्येनंतर दोघांनीही गाडी सोडली आणि पळून जाण्यात यश मिळवले. ही गाडी काही दिवसांनी मोगा जिल्ह्यात आढळून आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in