...तर मी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन; दुष्यंत चौतालांची जाहीर भूमिका

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण तापले आहे. या विधेयकाच्या मुद्द्यावर पंजाब आणि हरियानामध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे.
I will quit my post the day any danger to the MSP system is posed says Dushyant Chautala
I will quit my post the day any danger to the MSP system is posed says Dushyant Chautala

नवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून पंजाबमधील अकाली दलाने केंद्रातील एकमेव मंत्रिपदावर पाणी सोडले होते. यामुळे पंजाब शेजारच्याच भाजपशासित हरियानात राजकीय अस्वस्थता वाढली आहे. याचबरोबर या दोन्ही राज्यांमध्ये या कृषी विधेयकांना विरोध करीत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हरियानात भाजपबरोबर सत्तेत असलेले जननायक जनता पक्षाचे नेते व (जेजेपी) उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढला आहे. चौताला यांनी अखेर या प्रकरणी जाहीर भूमिका घेतली आहे. 

देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. ही बहुचर्चित दोन कृषी विधेयके आज राज्यसभेत विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर झाली. या विधेयकांवरुन सरकार विरुद्ध विरोधक असा वाद पेटला आहे. या विधेयकांवरुन विरोधक आक्रमक झाले असताना हा विरोध मोडून काढण्यासाठी भाजपने प्रत्येक खासदाराला कामाला लावले आहे. कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. आज त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. 

या विधेयकांना मंजुरी मिळाली असली तरी त्यावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंशसिंह यांनी आजच्या कामकाजात पक्षपातीपणा केला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. उपसभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी दाखल केला आहे. यामुळे हा विधेयकांवरुन सुरू झालेला वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कृषी विधेयकांना विरोध करीत अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा अचानक राजीनामाच दिला होता. हरियाना हे पंजाबइतकेच कृषिप्रधान राज्य असून, येथील अर्थव्यवस्थाही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारी विधेयके, असे वर्णन होणाऱ्या या विधेयकांवर नरेंद्र मोदी सरकारने ताठर भूमिका घेतली होती. यामुळे चौताला यांच्यावर पक्षातूनच प्रचंड दबाव आला आहे. 

चौताला यांनी नुकतीच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली होती. त्यानंतर तेथील राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. कृषी विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर बोलताना चौताला म्हणाले की, संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांमध्ये किमान हमी भाव व्यवस्था संपवण्याबाबत कोणताही उल्लेख नाही. किमान हमी भाव व्यवस्थेला ज्या दिवशी धोका आहे, असे समोर येईल त्या दिवशी मी राजीनामा देईन. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com