Khushboo Sundar News : 'जे काही बोलले, त्याचा संकोच वाटत नाही' : कटु अनुभवाबद्दल खूशबू सुंदर पुन्हा बोलल्या...

Khushboo Sundar father physically abused her : कटूब अनुभव सांगण्यामागे माझा उद्देश वेगळा होता..
Khushboo Sundar News : Khushboo Sundar father physically abused her :
Khushboo Sundar News : Khushboo Sundar father physically abused her : Sarkarnama

Khushboo Sundar National News : भाजप नेत्या व अभिनेत्री खूशबू या मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ८ वर्षांपासून माझे वडील माझं माझं लैंगिक शोषण करत होते', असा खुलासा त्यांनी केला होता. यानंतर त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. आज पुन्हा खूशबू यांनी याविषयावर भाष्य केले आहे. 'मी जे काही या बद्दाल बोलले, त्याची मला लाज वाटत नाही. यामागे माझा उद्देश वेगळा होता.' असे खूशबू यांनी म्हंटले आहे.

मी कोणतेही धक्कादायक गोष्ट सांगितली नाही. माझी अशी भावना आहे की, मी काही गोष्टी सांगितल्या त्यामागे माझा हा एक प्रामाणिकपणा होता, ज्याचा मी खुलासा केला आहे. मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याची मला लाज वाटत नाही. कारण या घटना माझ्यासोबत घडल्या आहेत. मला असं वाटतं की, गुन्हेगाऱ्याला त्याची चूक कळायला हवी.

Khushboo Sundar News : Khushboo Sundar father physically abused her :
Womens day News; `ट्रीलीयन डॉलर`चे लक्ष्य महिलाच पूर्ण करतील

तसेच, या गोष्टींचा उलघडा करण्यामागे माझा उद्देश वेगळा होता. मला सुचवायचं होतं की, खंबीर राहीलं पाहिजे? सक्षम राहीलं पाहिजे. स्वतःला कमी लेखू नका. आपलं आयुष्य संपलं, असले विचार मनात कधी आणू नका, असा संदेश त्यांना लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या महिलांना दिला आहे. मला वाटते की, महिलांनी अशा घटनांबद्दल आवाज उठवणे गरजेचं आहे. पिडीतांना सांगणे गरजेचे आहे असे खूशबू म्हणाल्या.

Khushboo Sundar News : Khushboo Sundar father physically abused her :
Maharashtra Assembly News: महिला दिनीच विधानसभेत महिला आमदार कडाडल्या : काय आहे कारण?

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वीच खूशबू सुंदर यांनी स्वत:सोबत घडलेल्या वाईट गोष्टीबाबतचा खुलासा केला होता. 'मी आठ वर्षांची असल्यापासून माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते. मी जेव्हा १५ वर्षांची झाले, तेव्हा माझ्यामध्ये त्यांच्याविरोधात बोलण्याचं धाडस झालं. पण परिवारातील इतर सदस्यांना त्रास होऊ नये, म्हणून मी सतत आठ वर्षं याबद्दल शांत राहिले.

आपल्याला कायम एका गोष्टीची धास्ती वाटत होती. ‘काहीही झालं तरी, आपला पती म्हणजे, पती ईश्वर आहे’ अशा मानसिकता असलेली माझी आई, माझ्या बोलण्यावर ठेवणार नाही, असं मला नेहमी वाटायचं, असा कटु अनुभव खूशबू सुंदर यांनी सांगितली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com