मी तर चोरांचा सरदार... : कृषिमंत्र्यांचे अजब विधान!

मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी जे काही बोललो आहे, त्यावर मी अजूनही कायम आहे. जी सद्यपरिस्थिती आहे, त्यावरच मी बोललो आहे.
Sudhakar Singh
Sudhakar SinghSarkarnama

पाटणा : बिहारचे (bihar) कृषिमंत्री (Agriculture Minister) सुधाकर सिंह हे त्यांच्या एका विधानामुळे (statement) चर्चेत आले आहेत. ‘कृषी विभागात अनेक चोर आहेत आणि ते चोरांचे (Thief) सरदार आहेत. माझ्यावरही अनेक चोर आहेत,’ असे वक्तव्य कैमूरमधील एका सभेत बोलताना मंत्री सिंह यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य माध्यमात आल्यानंतरही ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ‘मी जे काही बोललो आहे, त्यावर मी आजही ठाम आहे. जी वास्तव परिस्थिती आहे, तीच मी सांगितली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (I am the chief of thief's : Agriculture Minister Sudhakar Singh)

Sudhakar Singh
राष्ट्रवादीला दणका : शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त; काळेंना वर्षातच सोडावे लागले पद

कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले की, मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी जे काही बोललो आहे, त्यावर मी अजूनही कायम आहे. जी सद्यपरिस्थिती आहे, त्यावरच मी बोललो आहे. हे मी माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले आहे. तुम्हाला माध्यमांमध्ये जे चालवायचे ते चालवा, पण जनतेने मला निवडून दिलेले आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे, त्या व्यतिरिक्त मला काही बोलायचे नाही. जनतेच्या प्रश्नांवर मात्र मी कायम लढत राहीन.

Sudhakar Singh
सरकार कोसळल्यानंतर शरद पवार प्रथमच घेणार महाविकास आघाडीची बैठक

बिहारच्या कैमूर येथील सभेत बोलताना कृषी मंत्री सुधाकर सिंह म्हणाले होते की, मी चोरांचा सरदार आहे आणि माझ्यावरही अनेक चोर आहेत. आमच्या कृषी विभागाचा असा एकही भाग नाही, ज्यात चोरी होत नाही. त्यामुळे आम्ही चोरांचे सरदार झालो आहोत. मी जर हे बोललो नाही तर सर्व काही चांगले चालेले आहे, असे आपल्या सर्वांना वाटत राहील. पण परिस्थिती तशी नाही, असेही मंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

Sudhakar Singh
बलात्कार करून मुलीचा खून : मृतदेह ४२ दिवसांपासून खड्ड्यात मिठात ठेवला; न्यायासाठी कुटुंबांचा टाहो

कृषी विभागात आम्ही एकटेच चोरांचे सरदार नाही तर, आमच्यापेक्षाही वरचे अनेक लोक त्यात आहेत. बियाणे महामंडळ शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी १०० ते १५० कोटी रुपयांची चोरी करतात, असेही बिहारचे कृषीमंत्री सुधाकर सिंह यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com