मुख्यमंत्र्यांसोबत एका मंचावर कसे आले होते? लळीत यांनी दिले स्पष्ट उत्तर

Uday Lalit News : '...म्हणून मी सुप्रीम कोर्टाच्या पायरीवर नतमस्तक झालो होतो...'
Uday Lalit  and Eknath Shinde
Uday Lalit and Eknath Shinde Sarkarnama

Uday Lalit News : माजी सरन्यायाधीश उदय लळीत ( Uday Lalit) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) एकाच मंचावर कसे आले होते? याबाबत सांगितलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, ''या क्षेत्रात माझा ३९ वर्षाचा प्रवास आहे. त्यामध्ये काही वर्ष वकील म्हणून तर काही दिवस जेज म्हणून काम केलं. दोन वर्ष मुंबईत तर ३७ वर्ष दिल्लीत सुप्रीम कोर्टात काम केलं. मी जेव्हा दिल्लीत आलो तेव्हा पहिल्या दिसशीही सुप्रीम कोर्टाच्या त्या पायरीवर मी नतमस्तक झालो होतो. त्यानंतर शेवटच्या दिवशीही नतमस्तक झालो. कारण सुप्रीम कोर्टाबाबत माझ्या मनामध्ये आदर आणि भावना आहे. त्यामुळे मी नतमस्तक झालो होतो'', असं माजी सरन्यायाधीश लळीत यांनी सांगितलं.

Uday Lalit  and Eknath Shinde
पालिका आयुक्तांचा दणका; तीन कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत एकाच मंचावर कसे आलो होतो? याबाबत सांगितलं. ते म्हणाले ''ज्या कार्यक्रमामध्ये आम्ही एका मंचावर होतो तो कार्यक्रम मुंबई हायकोर्टाने आयोजित केलेला होता. त्यामुळे मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याच वेळी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रलंबित होतं. पण ते माझ्या खंडपीठासमोर नव्हतं'', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

Uday Lalit  and Eknath Shinde
Anil Parab : अनिल परब यांना दिलासा; साई रिसॉर्ट प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर!

तसेच ते पुढे म्हणाले, ''आपल्या राज्यातील मानूस दुसऱ्या राज्यात गेला तरी त्याला आपल्या राज्याबद्दल विशेष प्रेम असतं. त्यामुळे मी एक मराठी मानूस म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो. तसेच महाराष्ट्राचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे त्यात गैर काही नव्हतं, असं लळीत यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ता संघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रलंबित असताना मुख्यमंत्री शिंदे आणि माजी सरन्यायाधीश लळीत हे एका कार्यक्रमादरम्यान एकत्र आले होते. त्यांच्या एकत्र येण्यावरून देशभरातून प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. मात्र याबाबत लळीत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in