South Korea : हॅलोविन पार्टीत हॉरर शो: चेंगराचेंगरीत 151 ठार, 80 हून अधिक जखमी

South Korea | दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये मोठी घटना घडली आहे.
South Korea
South Korea

South Korea| नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये मोठी घटना घडली आहे. हॅलोविन पार्टी मध्ये झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान 151 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर 82 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हॅलोविनसाठी प्रसिद्ध असलेल्या इटावानमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती.

कोरोना महामारीनंतरचा हा पहिलाच आउटडोअर नो-मास्क हॅलोविन कार्यक्रम होता. तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार होता. लोक खूप आनंदात होते. या कार्यक्रमात अनेक परदेशी नागरिकही सहभागी झाले होते. मात्र, काही मिनिटातच त्यांच्या आनंदावर विरजण पडले. पार्टी सुरु असतानाच अचानक मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी व्हायला सुरुवात झाली. या चेंगराचेंगरी दरम्यान 151 लोकांचा मृत्यू झाला तर 82 हून अधिक जण जखमी झाले. गर्दीमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर अनेकांचा हृदयविकाराचा झटकाही आला

South Korea
Chhagan Bhujbal: `जरा धीर धरा आपले दिवस परत येतील`

पार्टीतील लोकांनी डझनभर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पिडीतांच्या कुटुंबियांना माहिती देण्यासाठी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी अधिका-यांना पीडितांची ओळख पटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सुरक्षा मंत्र्यांना संबंधित घटनेचे कारण शोधण्यासाठी तपासही सुरू करण्याचे आदेश दिले.

सोलच्या योंगसेन अग्निशमन विभागाचे प्रमुख चोई सेओन-बायोम यांच्या म्हणण्यानुसार, अनेकांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सेऊलच्या मुख्य पार्टी स्पॉट हॅमिल्टन हॉटेलच्या दिशेने जाणारा लोकांचा जमाव एका अरुंद गल्लीत घुसला आणि या वेळी गर्दी वाढल्याने परिस्थिती आणखी बिघडली. लोक गर्दीत चिरडले गेल्यामुळे जीवितहानी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com