मोदींच्या सुरक्षेत त्रुटी ; ५ जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांसह १३ अधिकार्‍यांना समन्स

मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP), पोलीस महानिरीक्षक (IG) आणि इतर वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांना हे समन्स देण्यात आले आहे.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

नवी दिल्ली : पंजाब मधील गुरुदासपूर जवळील एका पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा ताफा २० मिनिटे अडकून पडल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयीच्या चर्चेला सर्व माध्यमातून उधाण आले आहे. ही घटना म्हणजे सुरक्षेतील गंभीर चूक मानली जात आहे. या प्रकरणी गृहमंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

या प्रकरणी गृह मंत्रालयाने ५ जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकार्‍यांना समन्स पाठवले आहे. केंद्र सरकारच्या ३ अधिकार्‍यांनी या १३ अधिकार्‍यांना समन्स पाठवल्याचे वृत्त आहे. मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP), पोलीस महानिरीक्षक (IG) आणि इतर वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांना हे समन्स देण्यात आले आहे.

मोगा, मुक्तसर साहिब, फरीदकोट आणि तरन तारन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनाही समन्स बजावण्यात आलेल्या अधिकार्‍यांमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी १५० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौर्‍यावर होते. ते सकाळी विमानाने भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण खराब हवामानामुळे काही काळ वाट पाहूनही हेलिकॉप्टरने जाणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी अखेर गाडीनेच हुसैनीवालाला जायचा निर्णय घेतला.

Narendra Modi
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण

या दोन तासांच्या प्रवासात हुसैनीवालापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा अडकला. कारण पुढे काही आंदोलक आंदोलन करत होते. २० मिनिटे थांबल्यानंतर अखेर पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करून दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com