तेजस्वी सूर्यांच्या मागणीला अमित शहांकडून वाटाण्याच्या अक्षता

कर्नाटकातील खासदार तेजस्वी सूर्या यांनी राज्यातील भाजपच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. या प्रकरणी सूर्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
home ministry sanctions additional three branches of not nia excluding bengaluru
home ministry sanctions additional three branches of not nia excluding bengaluru

बंगळूर : बंगळूर हे दहशतवादी कारवायांचे केंद्रस्थान बनले आहे, असा धक्कादायक आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे. सूर्या यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून, त्यानंतर त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या सरकारविरोधात वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) शाखा बंगळूरमध्ये सुरू करावी यासाठी सूर्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घातले होते. मात्र, केंद्र सरकारने त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. 

सूर्या हे दक्षिण बंगळूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. भाजयुमोच्या अध्यक्षपदी सूर्या यांची नुकतीच निवड करुन त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. मात्र, सूर्या यांनी राज्यातील भाजप सरकारविरोधातच मोहीम उघडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सूर्या यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या प्रकरणात सूर्या यांची पाठराखण केली आहे. याबद्दल भाजप नेते खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. आपलाचा खासदार राज्य सरकारची प्रतिमा मलिन करीत आहे, अशी खंत काही नेते व्यक्त करीत आहेत.  

सूर्या यांनी नुकतीच अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) सुसज्ज आणि पुरेसे मनुष्यबळ असलेले कार्यालय कर्नाटकमध्ये सुरू करावे, अशी मागणी त्यांनी या भेटीत केली. याविषयी बोलताना सूर्या म्हणाले की, भारतातील सिलिकॉन व्हॅली अशी ओळख असलेल्या बंगळूरमध्ये मागील काही काळात अनेक दहशतवादी कारवाया उघडकीस आल्या आहेत. दहशतवादी गट त्यांच्या कारवायांसाठी बंगळूर शहराचा वापर करीत आहेत. शहरात अनेक स्लीपर सेल तपास यंत्रणांना उध्वस्त केले आहेत. 

गृहमंत्री अमित शहा यांनी लवकरात लवकर एनआयएचे कायमस्वरुपी कार्यालय राज्यात सुरू करण्यात येईल, असे म्हटले आहे. या कार्यालयात पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्याचेही शहा यांनी सांगितले आहे. डी जे हळ्ळी आणि के.जी. हळ्ळी येथील हिंसाचाराच्या  घटनांची चौकशी एनआयएने केली आहे. या तपासात दहशतवादी गट शहराचा वापर कारवायांसाठी करीत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सूर्या यांनी दिली. 

बंगळूरमध्ये एनआयएची शाखा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या सूर्या यांना अखेर अमित शहांनी डावलले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएच्या तीन शाखा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या शाखा इम्फाळ, चेन्नई आणि रांची येथे असतील. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाने बंगळूरसाठी कोणतीही घोषणा केलेली नाही. यामुळे पक्ष नेतृत्वाने सूर्या यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सध्या एनआयएच्या देशभरात नऊ ठिकाणी शाखा आहेत. यात गुवाहाटी, मुंबई, जम्मू, कोलकता, हैदराबाद, कोची, लखनौ, रायपूर आणि चंडीगड या शाखांचा समावेश आहे. आता आणखी तीन नवीन शाखा सुरू करण्यात येत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com