माझं कुटुंब पहिलं असेल..! जनगणनेबाबत अमित शहांची मोठी घोषणा

गृह मंत्रालयाने सोमवारी जनगणना शास्त्रीयदृष्ट्या अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
माझं कुटुंब पहिलं असेल..! जनगणनेबाबत अमित शहांची मोठी घोषणा
HM Amit Shah Latest Marathi News Sarkarnama

गुवाहाटी : गृह मंत्रालयाने सोमवारी जनगणना शास्त्रीयदृष्ट्या अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढची जनगणना ही ई-जनगणना असेल. तसेच ही जनगणना सुरू झाल्यानंतर त्यात पहिली नोंदणी मी आणि माझं कुटुंब करेल, अशी घोषणा शहा यांनी केली. (HM Amit Shah Latest Marathi News)

आसाममध्ये एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, धोरणं तयार करण्यासाठी जनगणना महत्वाची असते. केवळ जनगणनेच्या माध्यमातूनच विकासाची सद्यस्थिती, एससी आणि एसटी समाजाची स्थिती, लोकांचे राहणीमान तसेच शहरे आणि गावांची स्थिती समजू शकते. त्यामुळे गृह मंत्रालयाने जनगणना अधिक शास्त्रीय करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील जनगणना ही ई-जनगणना असेल. ती शंभर टक्के अचूक असणार आहे. (The next census will be an e-census)

 HM Amit Shah Latest Marathi News
मोठी बातमी : द्रेशद्रोहाच्या कायद्यात बदल होणार? मोदी सरकारचा दोन दिवसांतच यू-टर्न

जन्मानंतर त्याची नोंद जनगणना रजिस्टरमध्ये होईल. त्यानंतर संबंधित मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांचे झाल्यानंतर त्यांचे नाव मतदारयादीत नोंदवले जाईल. मृत्यूनंतर नाव वगळले जाईल. यामुळे नाव किंवा पत्त्यात बदलाची प्रक्रिया अगदी सुलभ असेल. सर्व माहिती एकमेकांशी जोडली गेलेली असेल, असं शहा यांनी स्पष्ट केलं.

जन्म आणि मृत्युचे रजिस्टर जनगणनेशी जोडले जाईल, असे शहा यांनी स्पष्ट केलं. 2024 पर्यंत प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंद होईल. त्यामुळे देशाची जनगणना आपोआप अद्ययावत होईल. पुढील जनगणना पुढच्या 25 वर्षांच्या धोरणांना आकार देईल. सॉफ्टवेअर लॉन्च झाल्यानंतर ऑनलाईन माहिती भरणारे मी आणि माझं कुटुंब असेल, असं शहा यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.