2018 मध्ये हॉकीला स्पॉन्सर मिळत नव्हता; या गरीब राज्याचे मुख्यमंत्री आले धावून...

पुरूषांच्या हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळाले आहे.
Hockey bronze medal under the sponsorship by Odisha government
Hockey bronze medal under the sponsorship by Odisha government

नवी दिल्ली : हॉकीमधील ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपवत पुरूष संघानं इतिहास घडवला. तब्बल 41 वर्षांच्या खंडानंतर भारताला हॉकीत पदक मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळं देशभरातून या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण याच संघाला 2018 मध्ये स्पॉन्सर मिळत नव्हता. मुख्य स्पॉन्सर सोडून गेल्यानंतर भारतीय हॉकीसमोर अंधार होता. पण देशातील एका गरीब राज्याचे मुख्यमंत्री धावून आले अन् त्यांनी मदतीचा हात दिला. (Hockey bronze medal under the sponsorship by Odisha government)

पुरूषांच्या हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळाले आहे. या संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत इतिहास घडवला. यापूर्वी भारताला हॉकीमध्ये 1980 मध्ये सुवर्णपदक मिळालं होतं. त्यानंतर भारताला पदकासाठी 41 वर्ष वाट पहावी लागली. हे पदक मिळवण्यात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचाही हातभार लागला आहे. पटनाईक सरकारच्या स्पॉन्सरशिपखाली संघानं हे पदक मिळवलं आहे. ओडिशा हे देशातील एक छोटं राज्य आहे. पण हॉकीला नवसंजीवनी देत या राज्यानं मोठं काम केल्याचं कौतुक सोशल मीडियात होत आहे. 

नवीन पटनाईक यांनाही हॉकी आवड असून शाळेत असताना ते गोलकिपर म्हणून खेळायचे. हॉकी इंडियाचे अधिकृत प्रयोजक असलेल्या सहाराने माघार घेतल्यानंतर पुरूष व महिला संघाला प्रयोजक मिळत नव्हता. 2018 मध्ये हॉकी इंडियासमोर अडचणी वाढत असताना पटनाईक यांचं सरकार मदतीला आलं. त्यांनी हॉकी इंडियाशी 100 कोटी रुपयांचा पाच वर्षांसाठी करार केला. 

या कराराला तीन वर्ष झाले असून त्याअंतर्गत जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, रिहॅब फॅसिलिटी, सरावासाठी मैदान, स्पर्धांमध्ये सहभाग अशा माध्यमातून हॉकीला नवसंजीवनी दिली जात आहे. पुरूष संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवत पटनायक यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. पटनायक यांनी 2014 मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्येही संघाला स्पॉन्सर केलं होतं. तसेच हॉकीच्या इतर स्पर्धांनाही त्यांनी मदत केली आहे. 

संघाच्या विजयानंतर सोशल मीडियात नवीन पटनायक यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी पटनायक यांचे आभार मानले आहेत. त्यांचे स्पॉन्सरशिप देतानाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. पटनायक यांनी स्वत: सकाळी सामना बघत विजयाचा आनंद साजरा केला. तसेच विजयानंतर त्यांनी खेळाडूंशीही संवाद साधत त्यांचे कौतुक केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com