प्रियांका लखीमपूरमध्ये : 1984 च्या दंगलीची आठवण करून देणारे होर्डिंग्ज झळकले

शीख समाज (Sikh community) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य सरदार परविंदर सिंग यांच्यानावे हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
प्रियांका लखीमपूरमध्ये : 1984 च्या दंगलीची आठवण करून देणारे होर्डिंग्ज झळकले
Priyanka Gandhi sarkarnama

लखनौ : काँग्रेसच्या (congress) सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आज दुसऱ्यांदा लखीमपू्र खेरीच्या (Lakhimpur Kheri) दौऱ्यावर होत्या. काही दिवसांपूर्वी हिंसाचारात मृत झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थनासभेचे (अंतिम अरदास) आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी होण्यासाठी त्या लखीमपू्रमध्ये आल्या होत्या. यात संयुक्त किसान मोर्चासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.

मात्र आजच्या याच दौऱ्वावेळी लखीमपूरमध्ये प्रियांका गांधींविरोधात 1984 सालच्या दंगलीची (1984 Delhi riots) आठवण करून देणारे होर्डिंग्ज झळकलेले बघायला मिळाले. लखीमपूरच्या रस्त्यांवर शीख समाज आणि उत्तर प्रदेश अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य सरदार परविंदर सिंग यांच्या नावे हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

या होर्डिंग्जवर "नहीं चाहिए फर्जी सहानुभूती, खून से भरा है दामन तुम्हारा, तुम क्या दोगे साथ हमारा, नहीं चाहिए साथ तुम्हारा"

अशा प्रकारे 1984 सालच्या दंगलीशी संबंधित मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर काही होर्डिंग्जवर 1984 सालच्या दंगलीला जबाबदार असणाऱ्यांनी आज शीख समाजाच्या जखमेवर मीठ चोळू नये असेही म्हंटले आहे. यातील काही होर्डिंग्जवर दसमेश सेवा सोसायटीचे अध्यक्ष सतपालसिंग मीत यांचे देखील नाव लिहिण्यात आले आहे.

राकेश टिकैत यांच्याकडून केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आजच्या अंतिम अरदासमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh tikait)देखील उपस्थित होते. या दरम्यान बोलताना त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (ajay mishra)यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सोबतच जर राजीनामा दिला नाही तर लखीमपूरमधूनच आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.