उद्धव ठाकरेंच्या 'तुटून पडा' आदेशाला भाजपचे 'सडेतोड' उत्तर; केशव उपाध्येंची जहरी टीका

Shivsena | BJP | Keshav Upadhye : राज ठाकरे आणि भाजपवर तुटून पडा...
उद्धव ठाकरेंच्या 'तुटून पडा' आदेशाला भाजपचे 'सडेतोड' उत्तर; केशव उपाध्येंची जहरी टीका
Uddhav Thackeray, Keshav Upadhye .jpgsarkarnama

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackerya) यांच्या नेतृत्वात काल वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या (Shivsena) सर्व खासदारांची आणि प्रवक्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे यांनी सर्व प्रवक्त्यांना "राज ठाकरेंवर तुटून पडा" असे आदेश दिले आहेत. "बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे (Raj Thackeray) कुठे होते? राम मंदिर यात्रेवेळी राज ठाकरेंचं काय सुरु होतं? त्यांचे आणि भाजपचे हिंदुत्व किती बोगस" आहे हे सगळ्यांना दाखवा, सडेतोड उत्तर द्या, असे स्पष्ट आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय बैठकीत शिवसंपर्क अभियान आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली.

यानंतर राज ठाकरे आणि भाजपच्या (BJP) बचावासाठी भाजपचे नेते मैदानात उतरले आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना नुकतेच दिलेत म्हणे. त्यात भाजपाचं हिंदुत्व खोटं ठरवण्यासही सांगितले आहे. पण ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलं आहे, ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध केवळ बोलण्यापुरता राहिला आहे, त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वावर बोलूच नये.

Uddhav Thackeray, Keshav Upadhye .jpg
PM मोदींचे वारसदार कोण? दिग्गज राजकीय चाणाक्यांचा रोख नेमका कोणाकडे?

शिवसेनेचे हिंदू हित शुन्य

भाजपासाठी हिंदुत्व हा आत्मा आहे. तुमच्यासारखं गरज असेल तेव्हा वापरलं आणि नसेल तेव्हा सोडून दिलं, असलं आम्ही कधी केलं नाही. म्हणूनच राम मंदिर, कलम ३७० सारखे मुद्दे आम्ही मार्गी लावले आहेत. आज तुम्ही हिंदुत्वाला अनुकूल अशी कुठलीही भूमिका घेतलीत तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील, म्हणूनच तुम्ही त्यांना सोईस्कर अशाच भूमिका घेत आहात. त्यात हिंदू हित शुन्य आहे.

Uddhav Thackeray, Keshav Upadhye .jpg
आदित्य ठाकरेंना घेवून मिलींद नार्वेकर तिरुपतीला : महत्वाच्या बैठकीला दोघांचीही दांडी

'तुमची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी'

थोडक्यात तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झाली आहे. तो केवळ डरकाळ्या फोडू शकतो, त्याकडून बाकी काही होणे शक्य नाही. तुमच्या नाकर्त्या कारभारामुळे तुमचे कार्यकर्ते तुमच्यापासून ‘तुटले’ आहेतच. ‘पडा’यचे बाकी आहे, ते निवडणुकीत होऊन जाईल! असे आव्हानही दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.