भाजपची डोकेदुखी वाढली! बड्या नेत्याच्या विरोेधात हिंदुत्ववादी संघटनाच उतरली मैदानात

भाजपच्या बड्या नेत्याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना मैदानात उतरली आहे.
K S Eshwarappa with PM Narendra Modi
K S Eshwarappa with PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) हे अडचणीत आले आहेत. कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) आत्महत्या प्रकरणी अडचणीत आल्याने त्यांना मंत्रिपद गमावावे लागले आहे. यातच आता त्यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना मैदानात उतरली आहे. ईश्वरप्पांच्या अटकेची मागणी या संघटनेने लावून धरली आहे. (K S Eshwarappa News)

अखिल भारत हिंदू महासभा या संघटनेने ईश्वरप्पा यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. ईश्वरप्पांना अटक करावी, अशी मागणी या संघटनेने लावून धरली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेश पवित्रन म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी भाजपकडून हिंदूंच्या भावनांचा वापर केला जात आहे. संतोष पाटील हा हिंदू होता आणि भाजपने त्याच्या हत्येची दखल घेतली नाही. याच प्रकारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक बालिगा यांची हत्या झाली होती. ते सुद्धा हिंदू होते परंतु, हिंदूचा वापर करणारे भाजप सरकार त्यांचे संरक्षण करु शकले नाही. सरकारने ईश्वरप्पांची हकालपट्टी करायला हवी होती. याउलट त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले.

K S Eshwarappa with PM Narendra Modi
भाजपच्या घाटगेंना हसन मुश्रीफ समर्थकांचं जशासं तसं उत्तर!

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी सरकारवर नामुष्की ओढवली आहे. भाजपचा कार्यकर्ता असलेल्या कंत्राटदाराने सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप करून आत्महत्या केल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. सुरवातीला या प्रकरणी सरकारने ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासही नकार दिला होता. अखेर दबाव वाढल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ईश्वरप्पांचा राजीनामा घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. नंतर काही तासांतच ईश्वराप्पांचा राजीनामा घेणार असल्याचे जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

K S Eshwarappa with PM Narendra Modi
राज ठाकरेंना आता मोदी सरकारकडून विशेष सुरक्षा? केंद्रीय पातळीवर हालचाली

बेळगाव येथील संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांना ईश्वरप्पा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार ईश्वरप्पा यांच्यासह आणखी दोघांवर संतोष यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे कंत्राटदार होते. तसेच हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपचे कार्यकर्तेही होते. उडपी येथील एका हॉटेलमध्ये 12 एप्रिलला त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com