Himachal Election: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांना भाषणादरम्यान अश्रू अनावर, कारण...

Himachal Election: माझ्या वडिलांना मुख्यमंत्री आणि मला केंद्रीय मंत्री केलं
Union Minister Anurag Singh Latest News
Union Minister Anurag Singh Latest NewsSarkarnama

Himachal Election: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू झाली आहे. भाजपकडून आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येत आहे. मात्र, भाजपने माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्यासह ११ जणांचे तिकिट कापले आहे. दरम्यान, त्यांच्या सुजानपूर मददारसंघात भाजप उमेदवार निवृत्त कॅप्टन रणजित सिंह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर भावूक झाले आणि भाषणा दरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले. (Union Minister Anurag Singh Latest News)

आज (ता. २१ ऑक्टोबर) सुजानपूर येथे भाजप उमेदवार निवृत्त कॅप्टन रणजित सिंह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर भावूक झालेले बघायला मिळाले. त्यांच भावूक होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी यावेळी सुजानपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवणं हे होत.

यावेळी भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री ठाकूरांना अश्रू अनावर झाले. त्यांनी यावेळी हमीरपूर जिल्ह्यातील भाजप (BJP) कार्यकर्त्यांपुढे नतमस्तक झाले. त्यांना स्टेजवर बोलण्यासाठी खूप धीर दिला गेला मात्र तरीही त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचा जोमाने प्रचार करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केले. यावेळी मात्र ते चांगलेच भावूक झालेले दिसले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या आदर आणि प्रेमाबद्दल त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले.

ठाकूर म्हणाले, हमीरपूर या छोट्या जिल्ह्यातून माझ्या वडिलांना मुख्यमंत्री आणि मला केंद्रीय मंत्री करण्यात आले आहे. मी ज्या मंत्रालयात केंद्रीय मंत्री आहे. त्या पदावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, चंद्रशेखर, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी आपल्या सेवा दिल्या आहेत. या गोष्टीचा अभिमान असल्याचेही त्यांनी त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याची अधिसूचना 17 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली होती. 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com