हिजाबचं वारं फ्रान्समध्येही; अध्यक्षपदाच्या उमेदवारानं केली बंदीची घोषणा

फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि उजव्या विचारसरणीच्या मरिन ली पेन यांच्यात थेट लढत होत आहे.
हिजाबचं वारं फ्रान्समध्येही; अध्यक्षपदाच्या उमेदवारानं केली बंदीची घोषणा
Marine Le Pen, Emmanuel MacronSarkarnama

पॅरिस : मागील काही महिन्यांत देशातील अनेक राज्यांमध्ये हिजाबवरून (Hijab) राजकीय वातावरण तापलं आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून येण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातल्यानंतर हा वाद पेटला होता. उच्च न्यायालयानेही (High Court) हा निर्णय मान्य केला. आता हे वारं थेट फ्रान्समधील (France) अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पोहचलं असून एका उमेदवाराने हिजाब बंदीची घोषणा केली आहे.

फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) आणि उजव्या विचारसरणीच्या मरिन ली पेन (Marine Le Pen) यांच्यात थेट लढत होत आहे. मॅक्रॉन हे उदारमतवादी नेते म्हणून ओळखले जातात. आता ही निवडणुकीत अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्याआधीच ली पेन यांनी निवडणूक जिंकल्यास हिजाब बंदीची घोषणा केली आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. फ्रान्समध्ये सध्या शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी आहे. पण इतर ठिकाणी तसे बंधन नाही.

Marine Le Pen, Emmanuel Macron
राऊत, खडसे समाज विघातक; असा झाला फोन टॅपिंगचा प्लॅन

फ्रान्समध्ये मुस्लिमांची (Muslim) संख्या जवळपास 8 टक्के एवढी आहे. हा आकडा जवळपास 50 लाख एवढा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिमांचाही प्रभाव असतो. फ्रान्समध्ये याआधीही हिजाब बंदीवरून अनेकदा वाद निर्माण झालेला आहे. हा मुद्दा आता थेट निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. ली पेने यांनी वाद निर्माण झाल्यानंतर हिजाब बंदीला प्राधान्य देणार नसल्याचे स्पष्ट केलं असलं तरी त्यांच्या प्रचारातील या मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे.

ली पेन या निवडणूक जिंकल्यास सुरूवातीला सरकारी सेवांमध्ये हिजाब बंदीची अंमलबजावणी केली जाईल, असं सांगितलं जात आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरात त्याची अंमलबजावणी होऊ शकते. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 24 एप्रिल रोजी होणार आहे. त्याला काही दिवस बाकी असतानाच यावरून वाद निर्माण झाला आहे. मॅक्रॉन यांनी प्रचारात हा मुद्दा उचलून धरला आहे. ते थेट मुस्लिम व इतर महिलांशी संवाद साधत हिजाब बंदीवर त्यांचं मत जाणून घेत आहेत.

जगात एकाही देशाने सार्वजनिक ठिकाणी हिजाब बंदी केलेली नाही. आपल्याला पहिला देश बनायचे आहे का, असा सवाल ते करत आहेत. एका सर्वेक्षणानुसार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 69 टक्के मुस्लिमांनी जीन-लुक मेलेनचोन यांना मतदान केलं होतं. ते या टप्प्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिले. आता ली पेन यांच्या वक्तव्यामुळे मॅक्रॉन यांना मुस्लिम मतदारांची मतं मिळण्याची आशा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.