हिजाब वाद आता मध्य प्रदेशातही: व्हायरल व्हिडीओनंतर प्राध्यापकाचे नवे फर्मान...

Hijab controversy | karnatak hijab row |madhya pradesh यानंतर अचानक काही हिंदुत्ववादी संघटनेचे लोक कॉलेजबाहेर जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
Hijab controversy in madhya pradesh
Hijab controversy in madhya pradesh

भोपाळ : कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादाचे पडसाद आता हळूहळू मध्य प्रदेशातही (Madhy pradesh) उमटू लागल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या दतियामधून समोर आला आहे.

सोमवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी पीजी कॉलेज दतियामध्ये (Datia) एक-दोन विद्यार्थीनी बुरखा परिधान करताना दिसल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि कॉलेजच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये व्हायरल झाला. यानंतर अचानक काही हिंदुत्ववादी संघटनेचे लोक कॉलेजबाहेर जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ही बाब कॉलेज व्यवस्थापनाच्या निदर्शनास येताच कॉलेजच्या प्राचार्यांनी त्वरीत, कॉलेजमध्ये प्रवेश करणाऱ्यांनी सभ्य कपड्यांमध्येच प्रवेश करावा आणि कोणीही बुरखा घालून येऊ नये, असे फर्मान काढले.

Hijab controversy in madhya pradesh
राऊतांचे आक्रमक भाष्य; पत्रकार परिषदेतील बॉम्बसाठी पुरवला दारुगोळा

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हिजाबवर बंदी घालण्याची मध्य प्रदेशातील ही पहिलीच वेळ आहे. आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सभ्य कपड्यांमध्ये येण्याच्या सूचना दिल्या आहेत, मात्र हिजाबबाबत वाद निर्माण झाल्याची ही बाब आमच्यापर्यंत प्रथमच आली आहे. मात्र कॉलेजमध्ये हिजाब परिधान करुन आलेल्या विद्यार्थीनीशी आम्ही बोलू शकलो नाही. ती कोण होती, ती कॉलेजमध्ये होती की नाही? तसेच आंदोलकांचा या महाविद्यालयाशी संबंध नाही. परीक्षा सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी एसपी सरांकडे तक्रार करून मार्गदर्शन केले जाईल, कारण ही संवेदनशील बाब आहे, त्यामुळे प्रशासनाच्या सहकार्याने याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डी.आर.राहुल यांनी फोनवर सांगितले आहे.

कर्नाटकातून वाद सुरू झाला

कर्नाटकात हिजाबचा वाद 1 जानेवारीपासून सुरू झाला होता. उडुपीमध्ये हिजाब परिधान केल्यामुळे 6 मुस्लिम विद्यार्थिनींना कॉलेजच्या वर्गात बसण्यास मज्जाव करण्यात आला. कॉलेज व्यवस्थापनाचे नवीन गणवेश धोरण हे त्यामागील कारण सांगण्यात आले. यानंतर या मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असल्याचे त्यांनी म्हटले. याच दरम्यान एका महाविद्यालयातून सुरू झालेला वाद इतर महाविद्यालयांमध्येही पोहोचला. तिथेही हिजाब घातलेल्या मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. दुसऱ्या गटातील विद्यार्थी भगवी उपरणे, स्कार्फ आणि साफा घालून कॉलेजमध्ये येऊन जय श्री रामच्या घोषणा देऊ लागल्याने वाद आणखी पेटला.

कर्नाटक उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी

त्याचवेळी, शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू आहे. मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती जे.एम खाजी यांच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या तणावाच्या परिस्थितीत कर्नाटकात सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. उडुपी जिल्ह्यातही कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com