आदित्य ठाकरेंची नम्रता आणि ममता बॅनर्जींची विनम्रता!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या. त्यांची भेट राजकीयदृष्ट्या गाजलीच. पण आदित्य आणि त्यांच्यातील जिव्हाळा देखील पाहायला मिळाला.
Mamata Banerjee & Aditya Thackeray
Mamata Banerjee & Aditya ThackeraySarkarnama
Published on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना भेटता आले नाही. यामुळे शिवसेना नेते संजय राऊत व पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी (Sanjay Raut & Aditya Thackeray) त्यांचे हात जोडून स्वागत केले. तेव्हा ममता यांनी सुद्धा अदित्यला वाकून नमस्कार केला. या दोघांच्या कृतीचे सोशल मिडियात स्वागत झाले. काहींनी तिरकस काॅमेंन्ट केल्या. पण वयाने आपल्यापेक्षा लहान असूनही ममता बॅनर्जी यांचे आदित्य यांना नमस्कार घालणे अनेकांना भावले.

Mamata Banerjee,Sanjay Raut & Aditya Thackeray
Mamata Banerjee,Sanjay Raut & Aditya ThackeraySarkarnama

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह स्वागत समारंभालाही त्या उपस्थित राहणार आहेत. आज सायंकाळी हाॅटेल ट्रायडन्ट येथे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे आणि राऊत यांनी ममता बॅनर्जींचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

Mamata Banerjee,Sanjay Raut & Aditya Thackeray
Mamata Banerjee,Sanjay Raut & Aditya Thackeray Sarkarnama

ममता बॅनर्जी यांना पर्यटन व पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे हे बुलढाणा येथील जगातील एकमेव असलल्या उल्काघात झालेल्या लोणार सरोवराचे छायाचित्र भेट देतांना. सोबत खासदार संजय राऊत.

Mamata Banerjee,Sanjay Raut & Aditya Thackeray
Mamata Banerjee,Sanjay Raut & Aditya ThackeraySarkarnama

रवींद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल लिहलेल्या काव्याची प्रत पाहताना ममता बॅनर्जी आणि अदित्य ठाकरे.

C.M Mamata Banerjee
C.M Mamata BanerjeeSarkarnama

26 /11 च्या दहशदवादी हल्ल्यात एकमेव पकडला गेलेला जिवंत आतंकवादी अजमल कसाबला पकडतांना शहिद झालेले पोलिस हवालदार तुकाराम ओंबाळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना ममता बॅनर्जी.

C.M Mamata Banerjee
C.M Mamata BanerjeeSarkarnama

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना बरे वाटू दे अशी प्रार्थना आपण सिद्धिविनायकाला केलीे. त्यांच्या तब्येतीला आराम वाटल्यावरच कामाला लागू दे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना त्यांनी सांगितले.

Shidhivinayak Temple
Shidhivinayak TempleSarkarnama

ममता बॅनर्जी यांच्या भेटीच्या वेळी सिद्विविनायकाच्या मूर्तीला असे सजवण्यात आले होते.

C.M Mamata Banerjee
C.M Mamata BanerjeeSarkarnama

दर्शन घेतल्यावर सिद्धिविनायकाची मूर्ती निरखून बघताना ममता बॅनर्जीं.

Mamata Banerjee
Mamata Banerjee Sarkarnama

सिद्धविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ममता बॅनर्जी यांचे स्वागत केले.

Mamata Banerjee
Mamata Banerjee Sarkarnama

ममता यांचा हा दौरा भाजपविरोधातील आघाडी बांधण्यासाठी तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com