रियाला जामिनासाठी उच्च न्यायालयाने घातल्या 'या' नऊ अटी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आला आहे. या प्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती हिच्यासह 18 जणांना अटक केली होती. महिनाभरानंतर अखेर रियाची जामिनावर सुटका झाली आहे.
high court sets nine conditions for actress rhea chakrabortys bail
high court sets nine conditions for actress rhea chakrabortys bail

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला  आहे मात्र, शौविकचा जामीन फेटाळला आहे. रियाला जामिनासाठी उच्च न्यायालयाने नऊ अटी घातल्या आहेत. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली आहे. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने म्हटले आहे. 

रियाला एनसीबीने 6 सप्टेंबरला अटक केली होती. तेव्हापासून न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ती सध्या भायखळा कारागृहात असून, शौविक हा तळोजा कारागृहात आहे. रिया आणि शौविक यांच्या वतीने त्यांचे वकील सतिश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायाधीश एस.व्ही कोतवाल यांनी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता.

रिया, शौविक, सुशांतच्या घरी काम करणारा दीपेश सावंत, सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि अब्देल बसित परिहार यांच्या जामिनावर उच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. न्यायालयाने रिया, दीपेश आणि सॅम्युएल यांना जामीन मंजूर केला. मात्र, शौविक आणि अब्देल यांना जामीन नामंजूर केला. 

उच्च न्यायालयाने रियाला जामिनासाठी महत्वाच्या नऊ अटी घातल्या आहेत. 
1) पासपोर्ट जमा करणे.
2) दर दहा दिवसांनी मुंबई पोलिसांसमोर हजेरी लावणे. 
3) एक लाख रुपयांच्या जातमुचलका देणे. 
4) देश सोडून न जाणे.
5) कोणत्याही साक्षीदाराला भेटायचे नाही.
6) मुंबईच्या बाहेर जायचे असल्यास तपास अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देणे. 
7) पुढील सहा महिने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तपास यंत्रणेसमोर हजर राहणे. 
8) न्यायालयात प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहणे.  
9) तपासात अथवा पुराव्यांमध्ये छेडछाड न करणे.

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. नंतर सर्वोच्च  न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com