योगी सरकारची आरोग्य व्यवस्थाच 'राम भरोसे'; उच्च न्यायालयाने फटकारले

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडेही वाढत आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र आहे.
high court says medical system in uttar pradesh is ram bharose
high court says medical system in uttar pradesh is ram bharose

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असून, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने (High Court) घेतली आहे. उत्तर प्रदेशातील मुख्य योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला न्यायालयाने आज फटकारले. 

राज्यात कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यात दिरंगाई होत आहे. अनेक ठिकाणी उपचाराविना रुग्णांचा मृत्यू होत आहे. याची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्यातील गावे आणि खेड्यांतील आरोग्यव्यवस्था आता राम भरोसे आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात हलगर्जीपणा सुरू आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. तेथील स्थिती अतिशय वाईट असून, त्यात तातडीने सुधारणा आवश्यक आहेत. 

मेरठ रुग्णालयात संतोष कुमार (वय 64) या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे. संतोष कुमार यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्य सरकारने रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी चार महिन्यांत पावले उचलावीत, असे न्यायालयाने सांगितले आहे. प्रयागराज, आग्रा, कानपूर, गोरखपूर आणि मेरठ या पाच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये सुरु करावीत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. 

उत्तर प्रदेशातील 20 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांमधील 40 टक्के बेड हे आयसीयूचे आणि 25 टक्के व्हेटिंलेटरचे असावेत. उरलेले 25 टक्के नॅसल बायपॅपचे असावेत. 30 पेक्षा जास्त बेडच्या रुग्णालयाचा स्वत:चा ऑक्सिजन प्लँट असावा. राज्यातील सेकंड आणि थर्ड टिअर शहरांमध्ये प्रत्येकी 20 रुग्णवाहिका पुरवाव्यात. प्रत्येक गावात किमान 2 तरी रुग्णवाहिका असाव्यात, असेही निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.   

देशात 24 तासांत 4 हजार 329 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 63  हजार 533 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 329 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 78 हजार 719 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर कालपासून (ता.17 मे) रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com